Crop Damage Compensation : कुडे, बोट परिसरामधील ३५ शेतकऱ्यांना भरपाई मंजूर

Water Canal : कालव्यांची दुरुस्ती न करताच वांद्री प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडल्याने पालघर पूर्वेस असलेल्या कुडे आणि बोट परिसरातील रब्बी पिकांचे नुकसान झाले होते.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon

Water Canal Issue Boisear : कालव्यांची दुरुस्ती न करताच वांद्री प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडल्याने पालघर पूर्वेस असलेल्या कुडे आणि बोट परिसरातील रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. हंगामापूर्वीच सोडलेल्या पाण्यामुळे ३५ शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत, असे सांगण्यात आले.

पालघरच्या पूर्वेतील गावांमध्ये दुबार शेतीसाठी वांद्री प्रकल्पातून कालव्यामार्फत पाणी सोडले जाते; मात्र या कालव्यांची अर्धवट दुरुस्ती करून शेतीसाठी पाणी जानेवारी महिन्यात सोडल्याने ते थेट रब्बी पिकांमध्ये गेले होते.

कुडे येथील १२.६४ हेक्टर, बोट येथील १.७५ हेक्टर क्षेत्र असे एकूण १४.३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार ३५ शेतकऱ्यांना एक लाख ९६ हजार २७० रुपये नुकसानभरपाई निश्चित केली आहे. त्यांना प्रतिहेक्टरी १३ हजार पाचशे रुपयांची भरपाई मिळणार आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : हिरड्याची नुकसान भरपाई मिळणार

प्रतिहेक्टर ३५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसंदर्भात मंडळ स्तरावर निर्णय होण्याचे आवश्यक आहे. सद्यस्थितीत निधी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे;

तर वांद्री प्रकल्प वितरण प्रणालीद्वारे बंदिस्त वाहिनीतून पाणी पुरवठ्याचा प्रस्तावही कोकण पाटबंधारे मंडळाकडे आहे, असे पत्र मनोर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कुणबी सेनेला दिले आहे.

जवळजवळ ३५ शेतकऱ्यांना हेक्टर १३,५०० रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देण्यात यावे, अशी ही मागणी केली होती. ती मागणी पटलावर येऊन त्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे.
दीपेश पाटील, सरचिटणीस, कुणबी सेना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com