Crop Damage Survey : पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना भरपाई

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.
Crop Damage Survey
Crop Damage SurveyAgrowon

Nanded News : गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील या नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला तत्काळ निर्देश दिले होते. रविवारी त्यांनी बारड, नागेली, पांढरवाडी, पाटनूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला.

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Crop Damage Survey
Crop Damage Survey : वादळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू

पाटनूर येथे परिसरातील सर्व शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. निसर्गाचा लहरीपणा हा अलीकडच्या काळात वाढत चालला आहे. यात विशेषत: मार्च, एप्रिल, मे मध्ये गारपिटीमुळे होणारे नुकसान आव्हानात्मक झाले आहे.

वादळ, वारे, अतिवृष्टीसह विमामध्ये गारपिटीचाही समावेश करणे आवश्यक आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनीही आता विमाबाबत अधिक काळजी घेऊन गारपिटीचाही अंर्तभाव कसा होऊ शकेल याची काळजी घेण्याचे, आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

पांढरवाडी शिवार येथे गोविंद चित्तलवाड यांच्या केळीचे झालेले नुकसान, कापावार शेंबोलीकर यांच्या टोमॅटोचे झालेले नुकसान तर पाटनूर शिवारातील जगदीश उपाध्याय, गोविंदराव देशमुख यांच्या शेतातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

प्रारंभी शासकीय विश्रामगृह येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल ती करण्याचा आग्रह धरला.

Crop Damage Survey
Unseasonal Rain : आभाळ फाटलेय, सरकार कुठेय?

‘आम्ही मदतीबाबत तत्काळ कार्यवाही करु’

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्याबाबत त्यांनी सभागृहालाही वस्तुस्थिती अवगत करून हे सरकार शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

या नुकसानीबद्दल आम्ही अधिक सजग असून जिल्हा प्रशासनातर्फे तत्काळ पंचनामे पूर्ण करून त्यांना मदतीबाबत तत्काळ कार्यवाही करू अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com