
Nagar News : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना संगणक शिकता यावे यासाठी भारजवाडी (ता. पाथर्डी) या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला (Zilha parishad School) शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन व निरंजन सेवा भावी संस्थेकडून सोलर पॅनेलसह संगणक संचाची भेट देण्यात आली.
शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया व निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा यांच्या हस्ते सोलर पॅनेल व संगणक संचाचे उद्घाटन करण्यात आले.
भारजवाडी (हनुमाननगर, ता. पाथर्डी) येथील शाळेत मंगळवारी (ता. २८) झालेल्या कार्यक्रमाला सर्पराज्ञी प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे, बालहक्क समितीचे समीर पठाण, पत्रकार गोकूळ पवार, अंगद पानसंबळ, सतीश मुरकुटे, राघू जपकर, पांडुरंग बटुळे, किरण मणियार, स्वप्नील कुलकर्णी, मुकुंद धूत, विशाल झवर, सुहास चांडक, सुमित चांडक, प्राजक्ता डागा, सविता झंवर, कृष्णा धूत, दिनेश अपूर्वा, सरपंच माणिक बटुळे आदी उपस्थित होते.
हनुमाननगर (भारजवाडी) शाळेतील मुलांचे सुंदर हस्ताक्षर व गुणवत्ता पाहून निरंजन सेवाभावी संस्था व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन यांच्या संयुक्त मदतीतून या शाळेला सोलर पॅनेल व संगणक कक्ष देण्याचा निर्णय घेतला होता.
जिल्हा परिषदेच्या शाळा इतके उत्कृष्ट नियोजन व आयोजन करू शकतात हे मी प्रथमच पाहत आहे. शहरातील शाळांना लाजवेल असा उपक्रम येथे राबवला जात असल्याचे समाधान वाटते, असे मत नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.