Pre-Monsoon Review Meeting : मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीची सांगता

Kharif Season : खरीप हंगाम पूर्व तयारी व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मॉन्सून पूर्व तयारी आढावा बैठक मंगळवारी (ता.२३) पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon

Pre-Monsoon Review Meeting In Vaijapur : वैजापूर तालुक्यात मॉन्सून काळात नदीकाठच्या गावाकडे तालुकास्तरीय आपत्ती विभागाने विशेष ठेवून त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवल्यास त्याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांना मदत कार्याची उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन आमदार प्रा.रमेश बोरनारे यांनी केले.

Monsoon Rain
Monsoon Measures : विभागीय आयुक्तांनी घेतला मराठवाड्यातील मान्सून उपाययोजना आणि पूर परिस्थितीचा आढावा

खरीप हंगाम पूर्व तयारी व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मॉन्सून पूर्व तयारी आढावा बैठक मंगळवारी (ता.२३) पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.

या बैठकीला सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, माजी सभापती भागीनाथ मगर, गटविकास अधिकारी एच.आर बोयनार, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, प्रशांत कंगले, रवींद्र कसबे, राजूभाई छानवाल, हरिभाऊ साळुंके, मल्हारी पठाडे यांच्यासह महावितरण, वनविभाग, जलसंधारण, कृषी विभाग, आरोग्य विभाग या यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कृषी विभागाने पीक उत्पादन स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे, वनविभाग, महसूल, कृषी, महावितरण या विभागांनी मॉन्सूनच्या पूर्वी आपली कामे पूर्ण करावी. आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आराखड्यांचे नियोजन करावे, अशा सूचना या बैठकीत आ. बोरणारे यांनी दिल्या.

एनडीआरएफच्या पथकाच्या संपर्कात राहून गरज भासल्यास खासगी बोटी, बोटी चालक यांची फोन नंबरसह यादी तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जे गाव दत्तक आहे. त्या बँकेने त्यांना कर्ज द्यावी असे आदेश दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com