Hungar Strike : अन्नत्याग करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना

शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरलेले कायदे व धोरणांचा निषेध करण्यात आला.
Hungar Strike
Hungar StrikeAgrowon

Nashik News : शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सुरू झालेले सत्र आजही थांबले नाही. सरकारे बदलली पण शेतकऱ्यांचे हाल थांबले नसल्याचा आरोप करत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी रविवार (ता. १९) रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी होत सहवेदना व्यक्त केली. विविध ठिकाणी शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी शेती धोरणांवर संताप व्यक्त केला.

जिल्ह्यात रविवार(ता. १९) रोजी सटाणा तहसिल कार्यालयासमोर सटाणा पंचक्रोशीतील सर्व शेतकरी तथा ग्रामस्थांचा अन्नदात्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवसीय अन्नत्याग व उपोषण करण्यात आले.

Hungar Strike
Hunger Strike : राज्यभरात किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरलेले कायदे व धोरणांचा निषेध करण्यात आला. सटाणा येथे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, बागलाण तालुका कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी,तालुका उपाध्यक्ष देविदास आहिरे,देवळा तालुकाध्यक्ष माणिक निकम,तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंजना आहिरे, नंदन आहिरे, केदू बोराडे, संतोष बोराडे, विजय आहिरे, शांताराम आहिरे, दिलीप शेवाळे, रमेश बच्छाव उपस्थित होते.

जिल्हाभरात अनेकांचा सहभाग

किसानपुत्र आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते नंदकुमार उगले भाऊसाहेब म्हैसधुणे, विष्णूपंत म्हैसधुणे, शिवाजी भोर, शिवराम उगले, साई म्हैसधुणे, कैलास फडोळ, बबन कडाळी, किशोर उगले, साहेबराव म्हैसधुणे मुंगसारे येथे सहभाग नोंदविला.

Hungar Strike
One Day hunger Strike : शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय अन्नत्याग कशासाठी?

सटाणा येथील उपोषणावेळी करण्यात आलेल्या मागण्या

१) कांदा जीवनावश्यक वस्तूंमध्ये वगळण्यात यावा.

२) पावसाळी कांद्याचे अनुदान वाढवून मिळावे.

३) पाणंद रस्त्यांसाठी लवकरात लवकर निधीची तरतूद व्हावी.

४) वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यावर वीज कंपनीने त्वरित बसून द्यावे.

५) बँकिंगमध्ये सिबीलची अट रद्द करण्यात यावी.

६) शेतकऱ्यांचा आत्महत्येचा गुन्हा सरकारवर दाखल झाला पाहिजे.

७) नुकसानग्रस्त शेती पिकांचे तत्काळ पंचनामे होणे बाबत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com