Budget Session : मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गोंधळ

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळात नव्हते. त्यामुळे अधिवेशनात सरकारची धुरा राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांभाळली.
 winter Session
winter Session Agrowon

Mumbai News : अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेदरम्यान संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा सोमवारी (ता. २०) सभागृह डोक्यावर घेतले.

महसूल, कृषी, पशुसंवर्धन, मत्यव्यवसाय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान एकही मंत्री नसल्याने विरोधकांचा भडका उडाला.

राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी या विषयाला हात घालत सरकारला धारेवर धरत सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. तर सभागृहाचे इतके अवमूल्यन करू नका, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी उद्विग्नता व्यक्त केली

अधिवेशन सुरू झाल्यानंतर दोन्ही सभागृहात मंत्र्यांना उपस्थित राहताना कसरत करावी लागत आहे. दोन्हीकडील कामकाजात सहभाग घेताना मंत्र्यांना धावपळ करावी लागत आहे.

 winter Session
Water Management : इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे वार्षिक अधिवेशन २० जानेवारीपासून

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळात नव्हते. त्यामुळे अधिवेशनात सरकारची धुरा राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांभाळली.

दुपारच्या सत्रात अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा सुरू झाल्यानंतर सभागृहात एकटे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील बोलायला उभे राहिल्यानंतर मंत्रीच समोर नव्हते. त्याला धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेत सरकारला कुठल्याच चर्चेचे गांभीर्य नाही. जर मंत्रीच सभागृहात नसतील तर चर्चा कोण ऐकणार आणि त्याला उत्तर कोण देणार असा प्रश्न विचारला.

भाजपच्या आशिष शेलार यांनी सरकारची बाजू सांभाळत कामकाजाचा क्रम बदलल्याने हा गोंधळ झाला आहे. पीठासन अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी क्रम बदलल्याचा निरोप आला तेव्हाच मंत्र्यांनाही निरोप दिला गेला. त्यामुळे सभागृहात येण्यास त्यांना उसंत हवी. ते लगेच येतील, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांच्या या वारंवार होणाऱ्या चुकीवर बोट ठेवून नाराजी व्यक्त केली. मंत्री सभागृहात नसतात, सभागृहात कोरम आहे की नाही हे पाहिले जात नाही.

काहीही झाले तरी किमान या सभागृहाचे अवमूल्यन तरी करू नका, असे सांगत सरकारवर ताशेरेही ओढले.

 winter Session
Pune Rain Update : पुणे जिल्‍ह्याला वादळी पाऊस आणि गारांचा तडाखा

गोंधळानंतर मंत्री सभागृहात

सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील धावत पळत सभागृहात आले. मात्र, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मत्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडत धारेवर धरले.

थोड्या वेळाने सत्तार काही वेळासाठी सभागृहात आले. त्यानंतर ते पुन्हा बाहेर गेल्याने त्यांच्यावर टीका झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com