Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये काँग्रेसची आघाडीवर, भाजपला फटका; जेडीएस ठरणार 'किंगमेकर'?

Karnataka Election Update : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी (ता.१३) सकाळी सुरुवात झाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देत कॉँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं.
Karnataka Election 2023
Karnataka Election 2023Agrowon

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी (ता.१३) सकाळी सुरुवात झाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देत कॉँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी सकाळी १० वाजेपर्यंत ११८ जागांवर कॉँग्रेसनं आघाडी घेतली आहे.

तर ७६ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तसेच जनता दलाने २५ जागांवर आघाडी घेतली आहे. अपक्ष ६ जागांवर आघाडीवर आहेत.

१० मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान पार पडले. आज (ता.१३) सकाळीच मतमोजणी सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून कॉँग्रेसनं आघाडी घेतली आहे. कर्नाटकमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दलांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती.

यंदाच्या निवडणूकीतही जनता दलाची भूमिका महत्त्वाची राहील असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे.

Karnataka Election 2023
Karnataka Election Vote 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवार फोडाफोडीची खेळी मोठ्या प्रमाणात झाली होती. याच पार्श्वभूमीवर निवडून आलेल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये याची पुरेशी काळजी काँग्रेसकडून घेण्यात येत आहे. निवडून आलेल्या सर्वच आमदारांना बंगलोरकडे रवाना करण्यात येणार असून तिथून जयपूरला हलवले जाण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्राने व्यक्त केली आहे.

मोठ्या लढती-

- माजी मुख्यमंत्री येददूरप्पा यांचा मुलगा बी.वाय विजेंद्रे शिकारीपुर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

- माजी मुख्यमंत्री जनता दलाचे अध्यक्ष एच डी कुमारस्वामी चनापटना मतदारसंघातून पिछाडी आहेत. तिथे भाजप उमेदवार आघाडी आहेत.

- कनकापुरा मतदार संघातून कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आघाडीवर आहेत.

- माजी मुख्यमंत्री भाजप नेते बसवराज बोंमाई शिंगगाव मतदार संघातून आघाडीवर आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com