
Sangli News : जिल्ह्यातील १२५ गावांमधील पिण्याच्या पण्याचे १४१ नमुने दूषित असल्याचे आढळून आले. कडेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे दहा टक्के पाणी नमुने दूषित आढळले.
संबंधित ग्रामपंचायतींनी तत्काळ पाणीपुरवठा यंत्रणेत योग्य ते बदल करून पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहेत.
जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची प्रत्येक महिन्यात तपासणी करण्यात येते. जानेवारी २०२३ मध्ये जिल्ह्यातील विविध गावांमधील २ हजार ४५१ पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये केडगाव तालुक्यातील सर्वाधिक २१ तर कवठे महांकाळमध्ये सर्वांत कमी २ नमुने दूषित आढळले आहेत.
पाणीपुरवठा होणारी गावे पुढीलप्रमाणे ः आटपाडी तालुक्यातील घरनिकी, घानंद, तळेवाडी, मुढेवाडी, राजेवाडी. जतमधील येळवी, प्रतापूर, कोळगिरी, गिरगाव, वज्रवाड, बालगाव, निगडीबुद्रुक, उटगी. कवठे महांकाळमधील घोरपडी, रायवाडी. मिरजमधील एरंडोली, मालगांव, मल्लेवाडी, टाकळी, कसबेडिग्रज, कवठेपिरान,
सावळवाडी, दुधगांव, इनामधामणी, जुनीधामणी, अंकली, भोसे, बेडग, शिंदेवाडी, तासगावमधील राजापूर, तुरची, चिंचणी, सावर्डे, वासुंबे, विसापूर, हातनोली, पेड, नरसेवाडी, पलूसमधील पुणदी, सावंतपूर, दहयारी, दुधोंडी, तुपारी, नागराळे, धनगाव, खंडोबाचीवाडी, भिलवडी, वसगडे, नागठाणे,
अंकलखोप, कुंडल, सांडगेवाडी, आंधळी, बुरुंगवाडी, बुर्ली, माळवाडी, विठ्ठलवाडी, सुखवाडी, चोपडेवाडी, आमणापूर, वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी, बिचूद, शिरटे, बोरगांव, बनेवाडी, मसुचीवाडी, साखराळे, साटपेवाडी, दुधारी, ताकारी,
गौडवाडी, येडेनिपाणी, विठ्ठलवाडी, धोत्रेवाडी, ढगेवाडी, चिकुर्डे, घबकवाडी, जांभुळवाडी, खरातवाडी, बहे, कापूसखेड, नेर्ले. शिराळातील खुजगाव, माळेवाडी, बिळाशी, हालेगाव, अस्वलेवाडी, मानेवाडी, सोनवडे, लादेवाडी, घागरेवाडी,
भैरेवाडी, चिखली, भागाईवाडी, पाडळी, तडवळे, खानापूरमधील शेडगेवाडी, बाणूरगड, बेनापूर, करंजे, बलवडीखुर्द, पारे, वाझर, गार्डी, कडेगावमधील रामापूर, वाजेगाव, अंबक चिंचणी, शाळगाव, येडे, बोंबाळेवाडी, बेलवडे,
हिंगणगाव बुद्रुक, उपाळेमायणी, उपाळेवांगी, खंबाळेऔध, कोतवडे, हिंगणगाव खुर्द, शिवाजीनगर, विहापूर, वडियेरायबाग, तडसर, आंबेगाव, खेराडेवांगी, हणमंतवडिये, कडेपूर.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.