Jalna News : ‘रिजनरेटिव्ह फार्मिंग’ विषयी वखारी येथे चिंतन

वखारी येथील कृषीवेध फार्मटेक फार्मर प्रोड्यूसर कंपनी व मटेरा इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या समन्वयातून चार गावांतील २०० एकरांवर प्रकल्प राबविला जाणार आहे.
Jalna News
Jalna NewsAgrowon

Jalna News : जिल्ह्यातील वखारी येथे ‘रिजनरेटिव्ह फार्मिंग’ (Regenerative Farming) विषयी नुकतीच चिंतनपर कार्यशाळा नुकतीच पार पडली. ‘रिजनरेटिव्ह फार्मिंग’ विषयी शेतकरी उत्सुक असून, चार गावांतील जवळपास दोनशे एकरांवर प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती समन्वयक निवृत्ती घुले यांनी दिली.

वखारी येथील कृषीवेध फार्मटेक फार्मर प्रोड्यूसर कंपनी व मटेरा इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या समन्वयातून चार गावांतील २०० एकरांवर प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी शेतकरी नोंदणी करण्यात आले.

या शेतीसाठी मटेरा इंडिया प्रा. लिमिटेडद्वारा वखारी, ता. जि. जालना येथे रिजनरेटिव्ह शेतीविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये शेतकऱ्यांना रिजनरेटिव्ह शेती पद्धतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन तसेच या प्रकल्पामध्ये समाविष्ट होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासोबतच कृषिवेध फार्मटेक फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे उद्‌घाटन या वेळी करण्यात आले.

Jalna News
वखारी येथे ६० एकरांवर अभ्यास प्रकल्प

या प्रसंगी मटेरा लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी लंडन येथील एडवर्ड ब्रियाल, प्रकल्प प्रमुख चंद्रमोहन बंद, शैलेंद्र ठाकूर, प्रकल्प व्यवस्थापक निवृत्ती घुले आणि गावचे सरपंच काकासाहेब पाटील घुले आदी उपस्थित होते.

रिजनरेटिव्ह शेती पद्धतीमधील ठळक बाबीवर भर देण्यात आला. जमिनीचे आरोग्य, पाणीबचत, जैवविविधता जोपासणे इत्यादीवर मार्गदर्शन करण्यात आले.

रिजनरेटिव्ह फार्मिंगनुसार शेती करण्यासाठी पहिल्या वर्षी कापसाचे पीक निवडण्यात आले आहे. अशा पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक एकरातील उत्पादित कापूस बाजार दरापेक्षा दहा टक्के अधिकचा दर देऊन खरेदी केला जाणार आहे.

Jalna News
Organic Farming : सहकारी सोसायटी देईल सेंद्रिय शेतीला चालना

याशिवाय शेतकऱ्यांना ठिबकसाठी मदतही दिली जाणार आहे. पिकाचे अवशेष शेतीतच कुजविण्यासाठी श्रेडर यंत्राचा वापर केला जाणार असल्याचेही श्री. घुले यांनी सांगितले.

कार्यक्रमाला वखारी, वडगाव, बाजीउमरद, धारकल्याण, भीलपुरी, कडवंची, पोखरी, टाकरवन, नांदुरा, साळेगाव, रामनगर, अंचली, नंदापूर सोबतच इतर गावचे शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com