Salam Kisan: गावात रोजगारनिर्मितीसाठी ‘सलाम किसान'चा हातभार

सलाम किसान अॅपच्या माध्यमातून विविध सेवा पुरवल्या जातात. शेतकऱ्यांना कमीत कमी दरात अत्याधुनिक तंत्रे उपलब्ध करून दिली जातात. त्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीसाठी हातभार लागतो.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

सलाम किसान हे अॅप (Salam Kisan App) केवळ शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांपुरते मर्यादित नसून गावातील इतर घटकांच्या विकासासाठी सुद्धा ते कार्यरत आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला (Rural Development) हातभार लागावा, ही त्यामागची दृष्टी आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालूका पातळीवर काही निवडक स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन शेतीच्या प्रगत तंत्राचे (Agriculture Technology) प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात शेतीसाठी लागणारी नवनवीन तंत्रे कसे हाताळयचे याविषयीची माहिती शेतकऱ्यासाठी उपलब्ध असेल.

Salam Kisan
Salam Kisan: शेतीतल्या सर्व अडचणींसाठी ‘सलाम किसान'ची सेवा

सलाम किसान अॅपच्या माध्यमातून विविध सेवा पुरवल्या जातात. शेतकऱ्यांना कमीत कमी दरात अत्याधुनिक तंत्रे उपलब्ध करून दिली जातात. त्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीसाठी हातभार लागतो. या तंत्राचे प्रशिक्षण स्थानिक तरूणांना दिले जाते. उदा. ९० सेकंदांत जागेवरच माती परीक्षण करणारे यंत्र चालवण्याकरिता निवडक स्थानिक तरुणांसाठी पाच दिवसांचे प्रशिक्षण ‘सलाम किसान'च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते.

Salam Kisan
Salam Kisan: सलाम किसान हे सुपरॲप इतरांपेक्षा वेगळे कसे?

माती परीक्षाणाप्रमाणे ड्रोन फवारणीच्या तंत्रज्ञानाचे सुद्धा पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाते. ‘सलाम किसान'च्या सेवांमुळे केवळ तरूणांनाच नव्हे तर महिलांनासुध्दा अप्रत्यक्षपणे फायदा होत आहे. खाद्य पदार्थ व बायोग्रेडेबल मटेरियलच्या पिशव्या बनविण्याचे काम महिला बचतगटांकडे सोपवले गेले आहे. त्यातून महिलांसाठी एक निश्चित रोजगार निर्मितीचा मार्ग खुला झाला.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांचा पुरवठा करून त्यांना सक्षम करण्यासाठी ‘सलाम किसान' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सलाम किसान' हे एक सुपरॲप असून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. ‘सलाम किसान'च्या माध्यमातून शेतकऱ्यानी प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच विविध उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

शेतीतील उत्पादनखर्च कमी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश त्यामागे आहे. शेतीमध्ये येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करणे, युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे, महिला वर्गाला सक्षम करून त्यांच्या उन्नतीसाठी हातभार लावणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून ‘सलाम किसान'ने कामाची आखणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com