Pest Control : बांगलादेशात जैविक पद्धतीने होणार लष्करी अळीचे नियंत्रण

लष्करी अळीच्या जैविक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी स्थानिक जैविक नियंत्रण केंद्राची स्थापना करुन मित्रकिटकांची निर्मिती केली जाणार आहे.
Pest Control
Pest ControlAgrowon

बांगलादेश कृषी संशोधन संस्थेच्या (बारी) सहकार्याने लष्करी अळीच्या (Army Worm) नियंत्रणासाठी बांगलादेशात (Bangladesh) स्थानिक बायोलॉजिकल कंट्रोल एजंट (बीसीए) सेंटर म्हणजेच जैविक नियंत्रण (Biological Control) केंद्राची स्थापन करण्यात येणार आहे. लष्करी अळीच्या जैविक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी स्थानिक जैविक नियंत्रण केंद्राची स्थापना करुन मित्रकिटकांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे लष्करी अळीचे नियंत्रण करणे सोपे होणार आहे.


१९८० नंतर मका हे बांगलादेशातील प्रमुख पीक बनले आहे. देशातील मका, कापूस, ज्वारी आणि इतर पिकावरिल लष्करी अळी ही प्रमुख किड आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते.

Pest Control
मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी व्यवस्थापन

या समस्यांचा विचार करुन लष्करी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी जैविक नियंत्रणाचा उपाय समोर आला. नियंत्रणासाठी ठिकठिकाणी स्थानिक जैविक नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. कृषी उद्योजकांना मित्र किटकांची निर्मिती करण्यासाठी मित्रकिटकांचा पुरवठा केला जाणार आहे. निर्मितीसाठी आवश्यक प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन तसेच आवश्यक साहित्यही पुरवले जाईल.


या उपक्रमाच्या प्रमुख डॉ. मरियम कादजमिरा यांनी अनेक घटक शेतकऱ्यांना बी.सी.ए.च्या उत्पादनात अडथळा कसा आणतात याबद्दल चर्चा केली आहे. यामध्ये स्थानिक बाजारपेठेत जैविक किड नियंत्रणासाठी आवश्यक मित्रकिटकांच्या उपलब्धतेचा अभाव, शेतकऱ्यांतील मित्रकिटका विषयीचे गैरसमज, मित्र कीटक पुरवण्यासाठी आवश्यक सुविधांचा आभाव, सरकारकडून अपुरा निधी, संशोधन शास्त्रज्ञ आणि विस्तार एजंट्स द्वारा तांत्रिक असहाय्यता इ. बाबींचा समावेश होतो. या समस्यांचा आभ्यास करुन या प्रकल्पाची आंमलबजावणी केली जाईल.


शास्त्रज्ञांच्या मते, जैविक नियंत्रण लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. कारण ते पर्यावरणाला किंवा मानवी आरोग्यास हानी न पोहोचवता लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण करते. जैविक नियंत्रणाचे योग्य नियोजन आणि प्रयत्नातून मका आणि इतर महत्वाच्या पिकांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com