Water Shortage : पाणीउपशावर नियंत्रण आवश्‍यक

कलोते मोकाशी धरणातून मनोरंजन पार्क, लगतचे धनिकांचे फार्महाऊसला पाणी उचलायची परवानगी पाटबंधारे विभागाकडून मिळालेली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Khalapur Water News : संभाव्य पाणीटंचाई (Water Shortage) टाळण्यासाठी यंदा राज्‍याला विशेष उपाययोजना कराव्या लागतील, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Deputy Chief Minister Devendra Fadwanis) यांनी केले आहे.

सद्यस्थितीत तालुक्यात असलेल्या धरणातील पाण्याचा उपयोग हा स्थानिक नागरिकांना कमी होत असून व्यावसायिक उपसा अधिक होत आहे. त्यामुळे खालापुरातील पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे.

खालापूर तालुक्यात चार मोठी धरणे आहेत. बारमाही पाणी असलेली पाताळगंगा नदी, तसेच नैसर्गिक स्त्रोत विपुल असतानाही केवळ प्रशासकीय नियोजनशून्य कारभारामुळे खालापूर तालुका सातत्याने टंचाईग्रस्त यादीत येत आहे.

Water Shortage
Water Conservation : जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया तुम्हाला माहितेय का?

पावसाळा संपताच खालापूर तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. विरोधाभास म्हणजे खालापूर तालुक्यातील या विपुल जलसंपदेवर या भागातील औद्योगिकीकरण बहरत असताना पिण्यासाठी आणि उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे.

सर्वांत मोठे धरण असलेले मोरबा धरण ५० किलोमीटर अंतरावरील नवी मुंबईची तहान भागवते. मात्र, धरणालगतच्या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

कलोते मोकाशी धरणातून मनोरंजन पार्क, लगतचे धनिकांचे फार्महाऊसला पाणी उचलायची परवानगी पाटबंधारे विभागाकडून मिळालेली आहे.

तर खोपोली-पेण मार्गावरील डोणवत धरणावर अनेक पेयजल योजना कार्यान्वित असल्‍याने व्यावसायिक वापरासाठी पाणी उपसा सुरू राहिल्यास गावांना तीव्र पाणीटंचाई भेडसावू शकते.

Water Shortage
Water Supply Department : अखेर मोखाड्यात पाणीपुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

खालापुरातील धरणे आणि साठवणक्षमता

मोरबा धरण - ३६० दशलक्ष घनमीटर

कलोते मोकाशी - ४.१९० द. घनमीटर

डोणवत - ३ दशलक्ष घनमीटर

भिलवले - २.१०० दशलक्ष घनलिटर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com