
सासुरे (जि.सोलापूर) ः वडाळ्यातील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांनी सुरे (ता. बार्शी) येथे खास रानभाज्यांपासून (Wild Vegetable) बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची पाककला स्पर्धा (Cooking Competition Of Wild Vegetable Dishes) आयोजित केली. या स्पर्धेत गावातील २५ महिलांनी सहभाग घेतला.
अलीकडच्या काळात पौष्टिक अशा रानभाज्यांचे आहारातील प्रमाण कमी होत चालले आहे. त्यासाठी महिलांना रानभाज्यांची ओळख, आहारातील महत्त्व तसेच रानभाज्यांपासून बनविल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची माहिती होण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या वेळी चिगळ भाजीपासून पकोडे, भाकरी, धपाटे, कटलेट, पालक भाजीपासून घारे, पालकपुरी आणि पालकसूप, कोथिंबीर वडी, काटे माटची भाजी, तांदुळजा भाजी, मेथी वडी असे विविध पदार्थ बनविण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना या वेळी बक्षिसेही देण्यात आली.
या उपक्रमासाठी कृषिकन्या मृणाली बनसोडे, मृणाल जाधव, दिशा कोळेकर, वैष्णवी कोरे, श्रुती आवताडे, शुभांगी कर्चे आणि श्रद्धा जाधव यांनी पुढाकार घेतला. यासाठी प्राचार्य डॉ. सचिन फुगे, प्रा. प्रज्ञा कुदळे, प्रा. प्रियंका बनकर, प्रा. गणेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.