एक वेचणी कापसाचा प्रयोग यशस्वी होईल का?

कापूस हे देशातील एक प्रमुख पीक आहे. मात्र कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात.
cotton
cotton agrowon

पुणेः कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यंदा शेतकरी कापसाचा पेरा वाढवण्याची चिन्हे आहेत. कापूस हे देशातील एक प्रमुख पीक आहे. मात्र कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. एक तर पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो शिवाय मजूर टंचाईला सामोरं जावं लागतं. त्यामुळं एकच वेचणी होण्याऱ्या कापूस वाणाची मागणी पुढे येत आहे. तेलंगणा सरकारने ५० हजार एकरवर एकच वेचणीच्या कापूस (cotton)लागवडीचा प्रयोग करण्याचं ठरवलंय. या प्रयोगाला यश आल्यास कापूस शेतीचा एकूण चेहरामोहरा आणि सगळं गणितच बदलेल, असं जाणकारांनी सांगितलं.

माॅन्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरिपासाठी कंबर कसली आहे. देशात खरीप हंगामात(kharif season) भातानंतर कापसाखाली सर्वाधिक क्षेत्र असतं. २०२१ च्या खरिपात देशात १३४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होती. भारतात जगातील सगळ्यात जास्त कापूस लागवड क्षेत्र आहे. जगात जेवढा कापूस लावला जातो, त्यापैकी एक तृतियांश क्षेत्र भारतात असतं. मात्र भारतात कापसाचा उत्पादन खर्च जास्त येतो. तसंच उत्पादकता कमी आहे. भारतात कापसाची प्रतिहेक्टरी उत्पादकता ४७३ किलोच्या आसपास आहे. तर जागतिक पातळीवर हेक्टरी ७६६ किलो कापूस मिळतो. भारतात मागील काही वर्षांपासून कापसाची उत्पादकता स्थिर आहे. सध्या कापसाची ज्या पध्दतीने लागवड केली जाते, त्यात झाड उंच वाढतं. त्यामुळे एकरी ७ ते ८ हजार झाडांचीच लागवड करावी लागते. तसेच वेगवेगळ्या टप्प्यांत फुलं आणि बोंड येतात. त्यामुळं तीन ते चार वेचण्या कराव्या लगतात. मजुरीवरचा खर्च वाढतो. कापूस उत्पादकांचा जवळपास २० टक्के खर्च हा कापूस वेचणीसाठी होतो. कापूस उत्पादकतेत आघाडीवर असलेल्या देशांमध्ये वेचणी एकाच वेळी यंत्राच्या(Machine) साह्याने होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेचणीचा खर्च वाचतो. भारतातही एकाचवेळी कापूस वेचणीला येईल, अशा वाणाची चाचणी सुरु आहे.

cotton
मतदार यादी अधिक अचूक करा;जिल्हाधिकारी

तेलंगणा सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तेलंगणा ५० हजार एकरवर एकच वेचणी होणाऱ्या कापसाची लागवड करणार आहे. कापसाचे हे वाण एकाच उंचीत वाढते. त्यामुळे यंत्राच्या साह्याने वेचणी शक्य होते. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची समस्या दूर होईल. सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांत तीन ते चार वेळा कापूस वेचावा लागतो. परंतू या वाणामुळे एकाच टप्प्यात वेचणी शक्य होईल. या पध्दतीत उत्पादकता ४० टक्क्यांनी वाढेल. तसेच एकाच वेचणीमुळे शेत लवकर रिकामं होईल. त्यामुळे तिथं कमी कालावधीचं दुसरं एखादं पीक घेता येईल. या पध्दतीत झाडांची संख्या जास्त असते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्षेत्रात या पद्धतीने कापूस लागवड होणार आहे. याचे चांगले परिणाम दिसून आल्यास मोठा दिलासा मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं.

असं असलं तरी ही पध्दत अधिक खर्चिक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्याच्या पारंपरिक पध्दतीत शेतकऱ्यांना लागवडीसाठी एकरी दोन ते तीन पाकिटे बियाण्याचा वापर करावा लागतो. एक पाकिट ४५० ग्रॅमचं असतं. परंतु या पध्दतीत ४ ते ५ पाकिट बियाणं लागेल. तसंच झाडांची एकसमान वाढ होण्यासाठी वाढ प्रतिरोधक फवारावं लागेलं. लागवडही यंत्राच्या साह्यानेच करावी लागेल. झाडांची संख्या जास्त असल्यानं कीड-रोगांचाही प्रादुर्भाव जास्त होईल. त्यामुळे कीडनाशकांची(Pesticides) फावरणी वाढवावी लागेल, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याशिवाय यंत्रानं कापूस वेचणी केल्यास काडीकचरा जास्त येईल. हा कापूस स्वच्छ करण्यासाठी जिनिंग मिल्सना क्लिनिंग मिशन्स बसावावे लागेल, असं उद्योगांनी सांगितलं.

असं असलं तरी पारंपरिक कापूस उत्पादन पद्धतीपेक्षा ही पद्धत अधिक फायदेशीर ठरू शकते, असं जाणकारांनी सांगितलं. त्यामुळं तेलंगणा सरकारच्या प्रयोगाचं फलित काय? यावर पुढची दिशा ठरेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com