Cotton Rate : कापूस उत्पादकांना राज्य सरकारने मदत करावी; आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी

कापसाच्या बाजारात प्रतिक्विंटल सात ते आठ हजारांच्या वर भावच मिळत नाही. त्यात केंद्र सरकारच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पार भरडला गेला आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Nandurbar Cotton News : राज्यातील हताश कापूस उत्पादक (Cotton Producer) शेतकऱ्यांना तत्काळ राज्य शासनाने मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना तारण योजनेतून पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आम आदमी (Aam Aadami) शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना इमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने कहर करून महाराष्ट्रातील बहुतांश भागात शेतीचे नुकसान झाले होते.

त्या नुकसानीतून शेतकऱ्यांच्या हाताला लागलेला कापूस शेतकऱ्यांना यंदा विकण्यासाठी चांगल्या भावाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Cotton Rate
Soybean, Cotton Rate : सोयाबीन, कापूस दरवाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

मागच्या वर्षी कापसाला १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. यंदाही त्याच भावाने कापूस विक्री होईल या आशेने शेतकरी सुखावला होता;

परंतु अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून हाती आलेल्या कापसातून उणीव भरून निघेल या आशेने ७० ते ८० टक्के शेतकरी बांधवांनी आपला कापूस घरात साठवून ठेवला असून, कापूस वेचणी होऊन दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे;

परंतु कापसाच्या बाजारात प्रतिक्विंटल सात ते आठ हजारांच्या वर भावच मिळत नाही. त्यात केंद्र सरकारच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पार भरडला गेला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या कापसाला भाव नाही.

त्यामुळे साठवून ठेवलेल्या शेतमालाला कीड लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असून, ही कीड साधीसुधी कीड नसून याच्यातून अनेक शेतकरी बांधवांच्या कुटुंबात खाज सुटण्याच्या प्रकाराने आजारी पडत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात आपला कापूस बाजारात आणावा लागत आहे. जिनिंग व्यवसाय ठप्प पडला असून, शेतकरी बांधवांनी ज्या कृषी केंद्रवाल्यांकडून बियाणे खाते व औषधे उधारीने घेतली आहेत आता ते पैसे वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा आहे.

रब्बी पिकांमधूनही शेतकऱ्यांच्या हाताला काही लागेल याची अपेक्षा नाही. कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी यांना तातडीने अनुदान देऊन त्यांना कपास प्रोसेसिंग उद्योग चालू करण्यासाठी शासनाद्वारे सहकार्य करावे, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com