Wild Animal Count : बुद्ध पौर्णिमेला वऱ्हाडातील अभयारण्यात प्राण्यांची गणना

Wild Animal Population : बुद्ध पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशात झालेल्या प्राणी गणनेचे अहवाल सादर झाले आहेत. यात वऱ्हाडातील अंबाबारवा, काटेपूर्णा या महत्त्वाच्या प्रकल्पात बिबट्यांचा अधिवास आढळून आलेला आहे.
Bibtya
BibtyaAgrowon

Akola Forest News : बुद्ध पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशात झालेल्या प्राणी गणनेचे अहवाल सादर झाले आहेत. यात वऱ्हाडातील अंबाबारवा, काटेपूर्णा या महत्त्वाच्या प्रकल्पात बिबट्यांचा अधिवास आढळून आलेला आहे.

अंबाबारवामध्ये विशेष म्हणजे तीन वाघही दिसून आले. तर, या दोन्ही प्रकल्पात प्रत्येकी तीन-तीन बिबटे दिसून आले आहेत. याशिवाय इतर प्राण्यांचाही अधिवास मोठ्या संख्येने आढळून आला आहे.

अकोला वन्यजीव विभागांतर्गत असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात शुक्रवारी ( ता. पाच) वैशाख पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात प्राणीगणनेची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ३०९ वन्यप्राणी व पक्ष्यांचे दर्शन झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

यात तीन बिबटे, ८० चितळ, सांबर ५, नीलगाय ६४, चिकारा १०, सायाळ २, माकड ३८, रानडुक्कर ६६, मोर लांडोर २८, ससा १३ असे प्राणी आढळले. प्राणी गणनेसाठी पाणवठ्यांशेजारी सात मचाणांवर प्रत्येकी एक अशा सात निसर्गप्रेमींची व्यवस्था करण्यात आली होती.

Bibtya
Bird Animal Count : ‘माळढोक’च्या अस्तित्वावर अखेर शिक्कामोर्तब

अंबाबरवामध्ये तीन वाघ, तीन बिबटे

संग्रामपूर तालुक्याच्या शेजारी सातपुड्यात असलेल्या अंबाबरवा अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना झाली. यात वाघ तीन, बिबटे तीन, अस्वल १२, नीलगाय ५४, सांबर ३७, भेडकी १५, गवा ६४, रानडुक्कर ४८, लंगूर ५१, माकड ११६, रान कोंबडी २०, रानमांजर ३, मोर ८५, ससा ५, सायाळ १ असे एकूण ५१७ वन्यप्राण्यांची नोंद झाली.

अंबाबरवा अभयारण्यात दुर्मिळ काळ्या पंखाचा कोकीळ, खाटीक पक्षीही आढळून आले. मराठा सुतार, लाल छातीची लिटकुरी, लाल कंठाची माशीमार, निलांग, राखी डोक्याचा पिवळा माशीमार, छोटा सुतार, पांढरपोट्या कोतवाल, कोतवाल, निळी माशीमार, युरेशियन चिमणमार ससाणा, करण पोपट, टोई पोपट, तांबट, जंगली पिंगळा, रानखाटीक, रानकोंबडी, कवडी, रामगंगा, पिवळा बल्गुली, कापशी घार, काळ्या पंखाचा कोकीळ-खाटीक, सामान्य सुभग, शकिरा, पिवळ्या मानेचा सुतार, मासेमारी, घुबड, तुरेवाला ईगल या पक्ष्यांची नोंद झाली आहे. हे अभयारण्य १४ हजार हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेले आहे. साग, साल, आवळा, बाभूळ, तेंदू, सालई, खैर, आंबा, अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, बांबू, बेहडा, धावडा, मोह, हिवर, उंबर असे महाराष्ट्रातील महत्त्वाचे वृक्ष या जंगलात आहेत. ३५ पाणवठ्यांवरील ३५ मचाणावर वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com