देश हा देव असे माझा

सैन्यात भरती होऊन त्याने अंतर्मनातील देशभक्तीची ज्योत पेटवली होती. ती देशभक्ती वडिलांकडूनच त्याच्यात स्फुरली होती. ते देशभक्तीचं स्फुरण आजही डोळ्यासमोर जसच्या तसं उभं आहे.
Independence Day
Independence DayAgrowon

सैन्यात भरती होऊन त्याने अंतर्मनातील देशभक्तीची ज्योत पेटवली होती. ती देशभक्ती वडिलांकडूनच त्याच्यात स्फुरली होती. ते देशभक्तीचं स्फुरण आजही डोळ्यासमोर जसच्या तसं उभं आहे. देशासाठी प्राणाचं बलिदान देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिवसेंदिवस वाढत होती. जणू काही पुढे असं होणार होतं. हे आधीच त्याला समजलं होतं. आर्मी जॉइन केल्यापासून नव्हे ट्रेनिंग काळापासूनच तो देशासाठी समर्पित भावनेने कार्यरत होता. सैनिक होणं सोपं नसतं. एखादा देशावर आधारित चित्रपट पाहिला तर ते जीवन पाहून आपले डोळे पाणावतात. पण त्याही पेक्षा कित्येक पटीने वेगळं असतं सैनिकाचं जीवन. स्वतःच्या जिवाभावाच्या माणसांना सोडून सैनिक देशाच्या रक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस आणि अनेक संकटे झेलत अहोरात्र उभा असतो.

Independence Day
कृषी सहायकांची आंदोलनाची हाक

आपण सुरक्षित असतो फक्त आणि फक्त सैनिकांच्या जिवावर आणि त्यांच्या शतायुषी जीवनासाठी मग आपण थोडावेळ अंतर्मनापासून प्रार्थना केली तर? आपल्या देशाचे कल्याण होईल. आणि सैनिकांचे आयुष्यही सुंदर होईल. सैनिक आपल्या जीवनात सुरक्षारूपी आनंद निर्माण करतो मग आपणही दररोज सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून प्रार्थनारुपी आनंद निर्माण करूया.

Independence Day
मराठवाडा कृषी विद्यापीठात ५४.१७ टक्के पदे रिक्त

देशभक्ती, देशसेवा ही रक्तातच होती त्याच्या. त्याच्या मनात देश सोडून दुसरा विचार करताना पाहिलंही नाही. जिथे जिथे त्याची बदली व्हायची तिथे तिथे स्वतःच्या विचारांचा, कार्याचा एक वेगळा ठसा तिथे उमटत असायचा. हे तो शहीद झाल्यावर जाणीवपूर्वक तेथील ऑफिसर्स, सैनिक यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारातून लक्षात आले. ती मात्र रक्षाबंधनाला त्याला राखी मिळाली पाहिजे, या अट्टहासाने दरवर्षी त्याला राखी पाठवायची. पण आता राखीऐवजी हार घालण्याची वेळ तिच्यावर आली आहे. या हळव्या नात्याचं रूपांतर असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं.

देश रक्षिण्या लढतो

तो सीमेवरती...

दूरदेशी भाऊ माझा

मन माझे गहिवरती...

खूपदा वाटायचं, की किती दिवस आता पोस्टाने राखी पाठवणार एकवर्षी तरी मनगटावर अभिमानाची राखी बांधूया. पण नाही होऊ शकलं असं. शेवटी देशासाठी त्याने प्राणाचं समर्पण केलंच. आणि त्याची मनातली इच्छा अखेर पूर्ण झाली. काय म्हणावं या देशभक्तीपुढे ती एक चिंगारी असते. त्या पुढे स्वतःच्या जीवनाची फिकीर नसते. देशाला सैनिक देव मानून अविरत देशसेवा करतात. कोण होता तो... अहमदनगर जिल्ह्यातील, शेवगाव तालुक्यातील श्री. कचरदास आधाट यांचे पुत्र शहीद पंकज आधाट. कचरदास आधाट यांनीही १५ वर्षे आर्मीत देशसेवा केली. आणि पुढचा वारसा शहीद पंकज आधाटने अतिशय उत्तमरीत्या सांभाळला होता. या वीरास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मानाचा मुजरा!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com