Nashik APMC : नाशिक एपीएमसीची तातडीने निवडणूक घेण्याचे आदेश; हायकोर्टाचे शिंदे सरकारवर ताशेरे

APMC Election: नाशिक बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीला स्थगिती देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायलयाने ताशेरे ओढले. तसेच याप्रकरणी तातडीने निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Nashik APMC Election
Nashik APMC ElectionAgrowon

Nashik APMC court case : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC), सभापती-उपसभापती निवडणुकीला स्थगिती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) ताशेरे ओढले आहेत. यावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला नोटीस बजावून बाजार समितीच्या निवडणुका घेण्याबाबत तातडीनं बैठक घेण्याचे आदेश आहेत.

Nashik APMC Election
Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांना धक्का

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन संचालकांनी कोरोना काळात धान्य वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे आरोप करीत शिवाजी चुंभळे यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील दाखल केले होते.

दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला (SCEA) प्रलंबित अपीलावर शिंदे यांच्यासमोर सुनावणी होईपर्यंत निवडणुका न घेण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर नवनिर्वाचित संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

संचालकांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, कोर्टाने उपसचिवांनी दिलेले सभापती- उपसभापती निवडणूक स्थगितीचे आदेश बेकायदेशीर ठरवले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची निवड थांबविण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणीही न्यायालयाने केली आहे. उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान राज्य सरकारवर ताशेरे ओढले. लोकशाही ने निवडून आलेले संचालक अपात्र ठरण्यापूर्वीच त्यांच्या निवडणुकीस बंदी घालणे अयोग्य आहे. लोकशाही कायदा पद्धतीत हा निर्णय विसंगत आहे. असे ताशेरे ओढले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com