Crop Damage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७,५७७ हेक्टरवर पीक नुकसान

मराठवाड्यातील अनेक भागांत मागील दोन, तीन दिवसांपासून विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारीसह फळपिकांना फटका बसला.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : अवकाळी झालेल्या पावसामुळे (rain) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ हजार ५७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी ३ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील अनेक भागांत मागील दोन, तीन दिवसांपासून विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारीसह फळपिकांना फटका बसला.

पावसाची तीव्रता मंडळनिहाय कमी-अधिक असली तरी शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार ५ ते ७ मार्च दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ७ हजार ५७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

Crop Damage Compensation
Khandesh Rain : खानदेशात अनेक भागांत पाऊस

त्यामध्ये २७३ हेक्टर फळपीक, ४ हजार ७२४ हेक्टर बागायत, तर २ हजार ५८० हेक्टरवरील जिरायती पिकांचा समावेश आहे.

या बाधित क्षेत्रामध्ये औरंगाबाद तालुक्यातील २ हजार ४१४ हेक्टर, खुलताबाद तालुक्यातील १६२ हेक्टर, वैजापूर तालुक्यातील ४०२ हेक्टर, गंगापूर तालुक्यातील १ हजार ०३८ हेक्टर, कन्नड तालुक्यातील ५१९ हेक्टर, तर पैठण तालुक्यातील सर्वाधिक २ हजार ७४२ हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश आहे.

बाधित झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ३११८.५ हेक्टर शेतीवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये १७ हेक्‍टरवरील फळ पिकांसह, २०५५ हेक्टरवरील बागायत व १०४६.५ हेक्टरवरील जिरायती पिकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून देण्यात आली आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वादळासह हजेरी लावणाऱ्या पावसाने सुरू केलेले नुकसानीचे सत्र मंगळवारी (ता. ६) ही सुरूच होते. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक होती.

Crop Damage Compensation
Marathwada Rain : पाच जिल्ह्यांत अनेक भागांत अवकाळी पावसाचा दणका

वीज पडून १९ जनावरे दगावली...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव परिसरात सोमवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. यात महालगाव येथे रोहित्रावर वीज पडली. तसेच चांदेगाव येथे विष्णू पवार यांच्या शेतात वीज पडून दोन गायींचा मृत्यू झाला.

याशिवाय पैठण तालुक्यातील वडजी येथे वीज पडून रामेश्‍वर गोजरे यांचे दोन बैल मृत्युमुखी पडले. जवळपास ७ जनावरे जिल्ह्यात दगावली.

जालना जिल्ह्यात पाच गाई, दोन म्हशी अशी सात जनावरे दगावली. हिंगोली जिल्ह्यात दोन म्हशी आणि नांदेड जिल्ह्यात तीन म्हशी अशी मराठवाड्यात एकूण १९ जनावरे दगावली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com