९३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्यापोटी ६४ कोटी जमा

या योजनेत उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसानभरपाईची रक्‍कम ५३ कोटी ८० लाख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून मंजूर केली आहे.
९३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्यापोटी ६४ कोटी जमा
Crop InsuranceAgrowon

जळगाव ः जिल्ह्यात २०२१-२२ करिता प्रधानमंत्री पीकविमा योजना (PM Crop Insurance Scheme) आयआयसी लोमबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे अधिसूचित क्षेत्रात राबविली होती. या योजनेत शेतकरी हिस्सा (Farmers Contribution) म्हणून २७ कोटी ४८ लाख विमा कंपनीकडे भरले होते. यापूर्वी खरीप पिकांसाठी (Kharif Crop) मीड सीजन व स्थानिक आपत्तीसाठी विमा कंपनीकडून (Insurance Company) ६४ कोटी ९५ हजारांची रक्‍कम ९३ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली.

या योजनेत उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसानभरपाईची रक्‍कम ५३ कोटी ८० लाख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून मंजूर केली आहे. या र‍कमेपैकी कापूस वगळता इतर खरीप पिकांची नुकसानभरपाई नऊ कोटी ६९ लाख रकमेचे वाटप विमा कंपनीकडून करण्यात येत आहे. उर्वरित कापूस पिकाची देय असलेली नुकसानभरपाई रक्‍कम ५२ कोटी १९ लाख रुपये ४८ हजार १०७ शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com