Crop Damage Survey : पेणमध्ये नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यास सुरुवात

पेणमध्ये जवळपास ४० ते ५० हेक्टर आंब्‍यासह ८ ते १० हेक्टर वर भाताचे तर १० ते १२ हेक्टरवर कडधान्याचे नुकसान झाले आहे.
Crop Damage Survey
Crop Damage SurveyAgrowon

Pen News : तालुक्यात तासभर पडलेल्या पावसामुळे एसटी स्थानक, कोळीवाडा, विठ्ठल आळी, दातार आळी यासह अनेक ठिकाणी मंगळवारी पाणी साचले होते. आंबा, काजू, जांभूळ आदी फळ बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

अवकाळीमुळे झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करण्यास मंगळवापासू सुरुवात झाली आहे. तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक यांसह कृषी खात्यातील कर्मचारी यांना प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार तसेच तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्‍याची माहिती कृषी अधिकारी कृष्‍णदेव सुरवसे यांनी दिली.

Crop Damage Survey
Crop Damage : गारपिटीच्या नुकसानीचे तीन तालुक्यांतील पंचनामे प्रगतिपथावर

पेणमध्ये जवळपास ४० ते ५० हेक्टर आंब्‍यासह ८ ते १० हेक्टर वर भाताचे तर १० ते १२ हेक्टरवर कडधान्याचे नुकसान झाले आहे.पावसामुळे आंबा, काजूला आलेला मोहोर गळाला असून जांभूळ, करवंद यांसारख्या रानमेव्यालाही फटका बसला आहे.

पेण पूर्व विभागातील आंबा बागायतदार, भात शेती, कडधान्य यांच्या हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्‍याच्या तक्रारी आल्‍या आहेत. पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून संबंधित शेतकऱ्यांना लवकरच भरपाई देण्यात येईल, अशी माहिती सुरवसे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com