क्रिस्टल’चे उसामधील तणनाशक ‘होला’ बाजारात दाखल

लव्हाळा या तणाच्या नियंत्रणासाठी क्रिस्टलने अभ्यासपूर्वक नवीन उत्पादन आणले
crystal crop protection Company
crystal crop protection CompanyAgrowon

नाशिक: क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन (crystal crop protection) लि. या भारतीय कंपनीने ऊस (Sugar Cane) पिकातील तणांच्या बंदोबस्तासाठी ‘होला’ हे तणनाशक (herbicides) बाजारात आणले आले. ऊस पिकातील मुख्य अडचण असलेल्या लव्हाळा या तणाच्या नियंत्रणासाठी (Weed control) क्रिस्टलने अभ्यासपूर्वक नवीन उत्पादन आणले असल्याचा दावा कंपनीने केला.

crystal crop protection Company
‘रानमोडी’ विदेशी तणाच्या निर्मूलनाची मोहीम राबवा`

गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद अशा जिल्ह्यांत ‘होला’ या तणनाशकाच्या (herbicides0 चाचण्या घेण्यात आल्या. या उत्पादनाचा विक्री शुभारंभ नुकताच संगमनेर, नारायणगाव, नगर, कोल्हापूर, सोलापूर, फलटण, औरंगाबाद या ठिकाणांहून अधिकृतपणे करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलताना कंपनीचे झोनल मार्केटिंग प्रमुख राहुल जतकर यांनी ‘होला’ हे उगवून आलेल्या रुंद व लांब पानांच्या तणांना मारते. त्याची फवारणी जमिनीत पुरेशी ओल असताना तणे उगवल्यानंतर दोन ते चार पानांच्या अवस्थेत करावी. ऊस पिकासाठी हे तणनाशक (herbicides) पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला.

crystal crop protection Company
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; शेतकऱ्यांस ३ लाखांचा फटका 

या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने प्रत्यक्ष शेतातून (Farming) या उत्पादनाचे परिणाम दाखवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कंपनीचे कस्टमर मार्केटिंग प्रमुख सचिन मित्तल, कृषी उपाध्यक्ष सागर भांडेकर, रिजनल बिझनेस हेड मयूर जारकड, रिजनल मार्केटिंग मॅनेजर किरण दौंड, संशोधन आणि विकास विभागाचे संदीप भुसाळ यांच्यासह महाराष्ट्रातील वितरक, विक्रेते, कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com