Watermelon Cultivation : कलिंगडाची लागवड ठरली फायदेशीर

संत्रापट्टयात गेल्या काही वर्षात किडरोगाच्या परिणामी उत्पादकता प्रभावित झाली आहे.
Kalingad Cultivation
Kalingad CultivationAgrowon

Amravati News : केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडून फळगळतीसोबत (Horticulture) उत्पादकता वाढीसाठी व्यवस्थापनविषयक अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप करीत चांदूरबाजार तालुक्‍यातील जसापूरचे रहिवासी असलेल्या प्रदीप बंड यांनी तब्बल पावणेपाच एकरावरील संत्रा (Orange) काढून टाकला होता.

आता या क्षेत्रात त्यांनी संत्रा लागवड (Orange Cultivation) न करता केळी, हळद आणि कलिंगड लागवड (Watermelon Cultivation) केली आहे. पहिल्याचवर्षी व्यवस्थापनातून केळीची ३३ किलोची रासही त्यांना मिळाली.

संत्रापट्टयात गेल्या काही वर्षात किडरोगाच्या परिणामी उत्पादकता प्रभावित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून फायटोप्थोराच्या जोडीला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत फळगळीच्या समस्येला शेतकरी सामोरे जात आहेत.

Kalingad Cultivation
Orange Crop Management : शेतकरी नियोजन पीक : संत्रा

संत्रापट्टयातील वर्षानुवर्षांपासूनच्या या समस्यांचे निराकरण करण्यात केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था अपयशी ठरल्याचा आरोप त्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. यामुळे उत्पादकता व उत्पन्न प्रभावित झाल्याने अनेक शेतकरी संत्रा बागा काढून टाकत पर्यायी पिकांकडे वळले आहेत.

जसापूर येथील प्रदीप बंड यांनी देखील लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या निष्क्रीयतेला कंटाळत पावणेपाच एकरावरील बाग काढून टाकली. यातील एका शेतात ३६७ झाडे तर दुसऱ्या शिवारात ३१० झाडे होती. अनुक्रमे १२ आणि २२ वर्षे जुन्या या बागा होत्या.

सुरुवातीला या बागांमधून चांगले उत्पन्न होत होते.आता मात्र उत्पादकता खर्चाची भरपाई होत नसल्याने प्रदीप बंड यांनी पहिल्या शेतात केळीची तर दुसऱ्या भागात कलिंगड लागवड केली आहे. या पिकाच्या व्यवस्थापनाचा अनुभव नसतानाही संत्र्यापेक्षा ही पीक अधिक उत्पादन देत असल्याचे बंड सांगतात.

Kalingad Cultivation
watermelon : खानदेशात कलिंगड पीक परवडेना
संत्रा बागेतून गेल्या सात ते आठ वर्षांत अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. उत्पादकता खर्चाच्या २५ टक्‍केही भरपाई होत नाही, असा अनुभव आला. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडे सातत्याने मार्गदर्शनासाठी पाठपुरावा केला असता त्यातून काहीच साध्य झाले नाही. परिणामी संत्रा बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. गेल्या हंगामात केळीची ३३ किलोची रास मिळाली. परंतु कोरोनामुळे दर मिळाला नाही. हळद, कलिंगड लागवडीचा प्रयोग यावर्षी केला आहे.
प्रदीप बंड, शेतकरी, जसापूर, चांदूरबाजार, अमरावती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com