तूर लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?

वेळेवर करा तुरीची पेरणी
Tur sowing
Tur sowingAgrowon

महाराष्ट्रात खरीप हंगामात तूर हे प्रमुख कडधान्य पीक आहे. तुरीची पेरणी (Tur Sowing) वेळेवर म्हणजे ३० जूनपर्यंत होणे आवश्यक असते. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी पेरणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

जमीन

तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. चोपण क्षारयुक्त जमीन तुरीला मानवत नाही. शेवटच्या कुळवणीच्यावेळी हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी तयार करावी. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर वाफसा येताच कुळवणी करावी त्यानंतरच योग्य ओल असताना तुरीची पेरणी करावी. पेरणीपुर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची रायझोबीयम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

पेरणीचे अंतर व बियाणे

लवकर तयार होणाऱ्या वाणांची पेरणी ४५ बाय १० सेंमी अंतरावर करावी. मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी ६० बाय २० सेंमी. किंवा ९० बाय २० सेंमी अंतरावर करावी. आय. सी. पी. एल. ८७ वाणाच्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो, मध्यम मुदतीच्या विपुला फुले, राजेश्वरी व बीडीएन ७११ वाणांसाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लागवड करायच्या वाणांसाठी हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे.

Tur sowing
top 5 news : शेतकऱ्यांच्या दारातून तूर, हरभरा खरेदी करा !

सलग तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डिएपी पेरणीवेळी द्यावे. तुरीचे पिक सुरुवातीच्या काळात अतिशय सावकाश वाढते. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव (Weed) जास्त प्रमाणात जाणवतो. पीक ४५ दिवसांचे होईपर्यंत कोळपण्या कराव्यात खुरपणी करुन शेत तणमुक्त ठेवावे. तूर पीक बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच येते. पाऊस कमी झाल्यास किंवा पिकाला पाण्याचा ताण पडल्यास पाणी देण्याचे नियोजन करावे. यामध्ये फुलकळी लागताना, पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगांमध्ये दाणे भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. खते व पाणी याचा अवाजवी वापर टाळावा.

Tur sowing
व्यवस्थापन तूर पिकाचे

पीक संरक्षण

तुरीवर प्रामुख्याने मर आणि वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडींमध्ये फुलकिडे, पानाफुलांची जाळी करणारी अळी, पिसारी पतंग, शेंग माशी, भुंगेरे, निळे फुलपाखरु आणि घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भावानुसार एकात्मिक रोग आणि किड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात (Integrated Pest And Disease Management)

Tur sowing
तुरीमधील वांझ रोग बाधित क्षेत्रातील निष्कर्ष...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com