Bogus Seed In Yavatmal : बोगस बियाण्यांना लावा लगाम

अनधिकृत आणि बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये अशा प्रकारच्या निविष्ठा जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
Bogus Seed
Bogus SeedAgrowon

Yavatmal Agriculture News : अनधिकृत आणि बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये (Kharif Season) अशा प्रकारच्या निविष्ठा जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी केले.

सोमवारी (ता.१७) जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलत होते. खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. यंदा चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे.

दोन लाख ८४ हजार १७ हेक्टर सोयाबीन, एक लाख २४ हजार १०० हेक्टरवर तूर लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप हंगामासाठी पीकनिहाय बियाणे व खत निविष्ठांची मागणी सादर करण्यात आली.

Bogus Seed
Bogus Seed : भेसळयुक्त गहू बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

कापूस पिकासाठी २२ लाख ७५ हजार पॅकेटची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनसाठी दोन लाख ८२ हजार २४२ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे. १६ हजार १३३ क्विंटल तूर, ४१२ क्विंटल ज्वारी, ५३३ क्विंटल मूग आणि ४८२.६३ क्विंटल उडीद बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर एक लाख ८८हजार २४० टन रासायनिक खताची आवश्यकता आहे. यावर्षी ६२ हजार ८८० लिटर नॅनो युरिया उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रब्बी हंगाम एक लाख ४६ हजार ५४ टन खतसाठा उपलब्ध झाला होता. त्यापैकी ६६ हजार ९१३ टन खतसाठा शिल्लक आहे.

बैठकीला जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक बागडी, इफकोचे जिल्हा व्यवस्थापक फलटणकर, आरसीएफचे जिल्हा व्यवस्थापक देशमुख, जिल्हा बियाणे-खते विक्रेता संघाचे सचिव कमल बागडी आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com