केंद्रात सरकार तरी कांदाप्रश्‍नी भाजपकडूनच आंदोलन

मंत्री छगन भुजबळ यांचा भाजप नेत्यांना चिमटा
केंद्रात सरकार तरी कांदाप्रश्‍नी भाजपकडूनच आंदोलन
Chhagan Bhujbalagrowon
छगन भुजबळ
कपडे काढून घेऊन लंगोट देण्याचा प्रकार’ देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना उपाययोजना होताना दिसत नाहीत. पेट्रोल डिझेलचे दर ५० रुपयांनी वाढवायचे आणि केवळ पाच-दहा रुपये कमी करायचे, हा प्रकार म्हणजे कपडे काढून घेऊन लंगोट देण्याचा प्रकार असल्याची टीका भुजबळ यांनी केली.

नाशिक : ‘‘सध्या उन्हाळ कांद्याचे दर(Onion prices) मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र सध्या केंद्रात भाजपचे सरकार असताना कांद्याच्या प्रश्‍नावर भाजपचे लोक आंदोलन करत आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन बसावे आणि हा प्रश्‍न सोडवावा,’’ असा चिमटा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाच्या नेत्यांना काढला.

येवला येथील विविध कार्यकारी सोसायटी संचालकांचा सत्कार सोहळामंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, अरुण थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, विश्‍वासराव आहेर आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘कांदा उत्पादक(Onion growers) शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. या बाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. कांदा शेतकरी अडचणीत आला; त्या त्या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निर्यातीसह अनेक प्रश्‍न सोडविले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र भाजपचे लोक आता आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारकडे नाफेडसह इतर संस्थांच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com