दुग्ध व्यावसायिक विजेची गरज स्वतःच भागवणार

या दुग्धसंस्थांना दुधाची साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण, दूध पावडर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते. त्यासाठी भरमसाठ खर्च येतो.
दुग्ध व्यावसायिक विजेची गरज स्वतःच भागवणार
Dairy Agrowon

मागे देशात कोळसा टंचाई निर्माण झाली होती. यातून लोडशेडिंगचा प्रश्न पुढं आला होता. आता या लोडशेडिंगचा फटका उद्योगविश्वाला ही बसू शकतो. जर हे उद्योग नाशवंत पदार्थांशी संबंधित असतील त्यात अडचण निर्माण होते. अशाच अडचणींवर मात करण्यासाठी दुग्धव्यवसायिक वीज निर्मिती प्रकल्पाकडे वळत आहेत. पण यात विशेष काय असेल तर ही वीज अक्षय उर्जेपासून तयार करण्यात येईल.

कधीही न संपणाऱ्या उर्जेला अक्षय उर्जा म्हणतात. पृथ्वीच्या पोटात जे कच्चं तेल, दगडी कोळसा, समुद्रातील ज्वलनशील वायू हे कधीनाकधी संपणार असतं, करणं ते मर्यादित असत. शिवाय या संसाधनांच्या वापरामुळे प्रदुषणही होत. पण अक्षय ऊर्जा जस की सुर्यप्रकाश, वारा, पाणी यांपासून ऊर्जा निर्माण करता येते. शिवाय या संसधनांनुळे प्रदुषणही होत नाही. याला ग्रीन एनर्जी असं सुद्धा म्हटलं जातं.

या दुग्धसंस्थांना दुधाची साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण, दूध पावडर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते. त्यासाठी भरमसाठ खर्च येतो. शिवाय यातून बाहेर पडणाऱ्या कार्बनमुळे प्रदूषण होतं ते वेगळंच. यावर उपाय म्हणून दुग्धव्यवसायिक अक्षय उर्जेकडे वळत आहे.

दुग्धजन्य कचऱ्यापासून नैसर्गिक वायूची निर्मिती करण्याचा प्रकल्प गुजरात गांधीनगरमधील अमूलफेडने सुरू केला. यात दुग्धजन्य कचरा वापरून 400 मेट्रिक क्युबिक मीटर गॅस तयार होतोय. या गॅसपासून वीजनिर्मिती करून अमूल दरवर्षी 5 ते 6 कोटींची बचत करत आहेत. अमूलफेडने गांधीनगरमध्ये 1 मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला आहे.

मदर डेअरी आणि हटसन या कंपनीने सुद्धा अक्षय वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. हटसनला वर्षभरात जेवढी वीज लागते, त्या विजेच्या 75 टक्के गरज त्यांनी सौर आणि पवन उर्जेच्या माध्यमातून पूर्ण केली.

आता वाराणसीमधल्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने तर शेणापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारलाय. शेणापासून चार हजार मेट्रिक क्यूबिक मीटर एवढी वीजनिर्मिती क्षमता असणारा हा भारतातला पहिलाच प्रयोग असावा. या वीजनिर्मिती प्रकल्पातून 19 टन थर्मल एनर्जी आणि 2000 किलोवॅट विद्युत उर्जा निर्मितीच्या प्रकल्पाचं काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन अर्ध्यावर येईल अस नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने म्हंटलय. हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होईल.

भारतातील दुग्ध व्यवसायांना आवश्यक असलेल्या विजेची गरज भागविण्यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर वाढलाय. याला प्रोत्साहन म्हणून राष्ट्रीय दुग्धव्यवसाय योजनेअंतर्गत 67 जिल्हा सहकारी संस्थांना सौर उपकरणं देण्यात आली आहेत. तर सौर ऊर्जासाठी 16 डेअरी प्रकल्पांना मदत करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशातील बनास डेअरी संकुलाचं उदघाटन करायला गेले होते. त्यावेळी भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राला बळकटी देण आमच्या प्राधान्य क्रमात असल्याचं ते म्हंटले होते. मात्र सरकारी धोरणांमुळे या कामाला गती मिळत नसल्याचं दुग्धव्यवसायिकांच म्हणणं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com