Crop Damage In Marathwada : वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने बाजरी आडवी

सातत्याने एकापाठोपाठ एक संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : फुलंब्री तालुक्यात दोन दिवसांपासून वातावरणात बदल (Climate Change) झाल्यामुळे वादळी वारा आणि हलक्या पावसाने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

गणोरी येथे उन्हाळी बाजरी पीक गुरुवारी (ता. ६) सायंकाळी जोरदार वारा आणि त्यावर हलका पाऊस पडल्याने आडवे झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले (Crop Damage) आहे.

सातत्याने एकापाठोपाठ एक संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमंडत आहे.

कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी बेमोसमी पाऊस यात शेतकरी पुरता हैराण झाला आहे. तसेच दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांना अधून मधून सोसावे लागले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : सरसकट मदतीला चाप?

पिकाला पाणी देण्याच्या वेळेस पावसाने दांडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक वाया गेले तर जास्तीचा पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची दाणादाण झाली. त्यामुळे निसर्गाच्या या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे.

फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील राजू सांडू जाधव या शेतकऱ्याने आपल्या शेतात बाजरी पिकाची उन्हाळ्यात लागवड केली.

पिकाला सातत्याने रासायनिक खते व पाणी देऊन पीक एन जोमात फुलविले. असे असताना गुरुवारी सायंकाळी जोरदार वारा आल्याने संपूर्ण बाजरी पीक आडवे झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com