Junnar Rain : जुन्नर तालुक्यात गारांच्या पावसामुळे पिकांचं नुकसान

वादळी वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जुन्नर तालुक्यात सोमवारी (ता. ६) सायंकाळनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

Junnar Rain News : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागाला सोमवारी (ता. ६) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी आलेल्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Crop Damage) झाले आहे.

जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील मीना व कुकडी नदीच्या खोऱ्यात सोमवारी (ता. 6) वीस मिनिटे झालेल्या पावसाने जोरदार झोडपले, तर मंगळवारी (ता. ७) रोजी पहाटेच्या सुमारास जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ पाऊस पडला. तर, काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.

तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ, कुसूर, वडज, काले, येणेंरे, पारुंडे, निरगुडे, बेलसर, शिंदे, राळेगण, खामगाव या ठिकाणी गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. तर, काढणीच्या अवस्थेत असलेले गहू पीक पावसामुळे भुईसपाट झाले आहे.

पुन्हा पाऊस झाल्यास बुरशीचा प्रादुर्भाव वाढून हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती पिंपळगाव सिद्धनाथचे सरपंच विक्रम खंडागळे यांनी व्यक्त केली. तर, येथील शेतकरी मच्छिंद्र पानसरे यांनी एक महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या टोमॅटो बागेचे पूर्ण नुकसान झाले आहे.

Heavy Rain
Pune Rain : वादळी पाऊस, गारपीटीने दाणादाण

अवकाळी पावसाने नुकसान जुन्नरच्या पश्‍चिम भागात नुकसान

वादळी वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जुन्नर तालुक्यात सोमवारी (ता. ६) सायंकाळनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्याच्या मध्य व पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. घाटघर, अंजनावळे, देवळे परिसरात गारांचा पाऊस झाला.

या पावसाने शेतात काढून ठेवलेले व काढणीस आलेल्या गहू, तसेच कांदा पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात एकूण ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुन्नर व राजूर पर्जन्यमापन केंद्रावर अनुक्रमे १४ व १० मिलिमीटर पाऊस नोंदला गेला, तर अन्य केंद्रावर नारायणगाव ः ७, बेल्हा ः ५, निमगाव सावा ३, ओतूर ः ८, डिंगोरे ः ४, आपटाळे ३ मिलिमीटर पाऊस झाला.

घाटघर, ता.जुन्नर ः परिसरात पडलेल्या गारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com