Nashik Stormy Rain : वादळी पावसाने साडेसात हजार हेक्टरवर धुळधाण

ऐन सुगीच्या दिवसात गुढीपाडव्यासारख्या नवीन वर्षाच्या सणाला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतो, मात्र या संकटामुळे तो हरपल्याची एकंदरीत स्थिती आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nashik News : जिल्ह्यात १५ ते १९ मार्च दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, द्राक्ष, आंबा यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे नुकसान ७ हजार ७२० हेक्टर क्षेत्रावर झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली. राज्य कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर आता पंचनाम्यांना वेग आला आहे. त्यामुळे पुढे अधिक नुकसान समोर येणार असल्याची शक्यता आहे.

ऐन सुगीच्या दिवसात गुढीपाडव्यासारख्या नवीन वर्षाच्या सणाला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतो, मात्र या संकटामुळे तो हरपल्याची एकंदरीत स्थिती आहे.

आता तोंडाशी आलेला घास मातीत मिसळा त्यामुळे सणाचा गोडधोड जेवण सुद्धा नशिबात नाही तर मुखात जाणारा घासही आता कडू ठरला आहे.

जिल्ह्यात नांदगांव, निफाड, पेठ, चांदवड, येवला, देवळा, कळवण, दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. जिल्ह्यात ३९६ गावांमध्ये २० हजार ७८० शेतकरी बाधित झाले आहेत.

Crop Damage
Crop Loss : पावसामुळे शेतकरी संकटात, बहुतांश पिकांचं नुकसान

एकीकडे कांद्याला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू शकलेला नाही अशातच सर्व आशा रब्बी हंगामातील उन्हाळा खांद्यावर असताना मोठ्या प्रमाणावर कांदा पिकांना गारांचा मार लागला आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी या लागवडी उभ्या राहू शकत नाहीत तर काढणीयोग्य होत असलेल्या लागवडीमधील कांदा शेतकऱ्यांना चाळीत साठवता येणार नाही.तसेच कांदा बीजोत्पादन क्षेत्रावरही मोठे संकट कोसळले आहे.

परिणामी पुढीलवर्षी अनेक शेतकऱ्यांना विकत बियाणे घेऊन पुन्हा हंगाम उभा करावा लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका नांदगाव, चांदवड, निफाड, सटाणा, कळवण, पेठ, देवळा, येवला, सटाणा या तालुक्यात आहे.

कांद्याच्या दरातील घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून गहू पिकाला पसंती दिली. अनेक ठिकाणी गहू सोंगणी व मळणी सुरू होती. मात्र बहुतांश ठिकाणी अद्यापही कापणी बाकी असताना गव्हाचे उभे पीक वादळी वाऱ्यामुळे आडवे झाले आहे.

निफाड, कळवण, पेठ, चांदवड, येवला, देवळा, दिंडोरी, सटाणा, नांदगाव, सुरगाणा तालुक्यात हे नुकसान अधिक आहे. पश्चिम पट्ट्यातही आंबा पिकाचा मोहर व कैऱ्या तुटून पडल्याने यावर्षी उत्पादनावर मोठा परिणाम होईल असे पेठ सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कळवले आहे.

Crop Damage
Crop Damage : गुढीपाडव्याच्या दिवशी मंत्र्यांनी केली शेताची वारी

जिल्ह्यात पिकांचे नुकसान असे

पिके नुकसान

कांदा - ३५०१.४६

कांदा रोपे- ५१०

मका - २.८०

ज्वारी- ०.४०

गहू - १५२९.१२

टोमॅटो - १४

हरभरा - ४२.५०

भाजीपाला - ३७७.५०

द्राक्ष - ७६८.०३

आंबा - ९०३.४०

डाळिंब - ५५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com