औरंगाबाद, जालन्यात पावसाने आंब्याचे नुकसान

मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत गुरुवारी (ता.९) सायंकाळनंतर व रात्री उशिरा मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
औरंगाबाद, जालन्यात पावसाने आंब्याचे नुकसान
MangoAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत गुरुवारी (ता.९) सायंकाळनंतर व रात्री उशिरा मेघगर्जनेसह पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात एक- दोन ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून (Tree Falling) पडली. तर आंबा पिकाचे (Mango Damage) काही प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. शुक्रवारी (ता.१०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जालना जिल्ह्यात सरासरी ३.६ व बीड जिल्ह्यात सरासरी ०.९ मिलिमीटर पाऊस झाला. दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. गुरुवारी सायंकाळी चार नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, वैजापूर, खुलताबाद, औरंगाबाद व सिल्लोड तालुक्यातील काही भागात वादळासह पाऊस झाला. पिशोर परिसरात पावसामुळे लहान मोठी झाडे उन्मळून पडली.

सोनगिरी टेकडीवरील पाण्याच्या जलकुंभाशेजारील झाडे कोसळली. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन उघडल्या गेल्या. त्यामुळे शुक्रवारी पिशोर गावाला होणारा पाणीपुरवठा बंद राहिला. परिसरातील आंबा, चिकू आदी फळांच्या झाडांना या वादळी पावसाचा फटका बसला. रात्री आठ वाजता पावसाचा जोर कमी झाला. या पावसाने शेतात पाणी तुंबले. लहान ओढ्यातून पाणी वाहिले.

चिंचोली लिंबाजी परिसरात तसेच नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, रेउळगाव, तळनेर, टाकळी, अंतुर, लोहगाव, भरतपूर, बाळखेडा, गणेशपूर, दहेगाव, जांभळी परिसरात सायंकाळी पाऊस झाला. नेवपूर येथील येथील चिकूच्या बागा तसेच कारले, दोडके, गिलके, टोमॅटो यांचे बांधलेले मंडप वादळामुळे कोलमडून पडले. वैजापूर शहराला जवळपास तासभर जोरदार पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी झाडे व विजेचे पोल कोसळले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. आडगाव बुद्रूक परिसरात जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. गोंदेगाव, पहुरी, घोरकुड, वाकडी आदी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com