परभणी जिल्ह्यात भाजीपाला, ऊस पिकांचे नुकसान

परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बुधवारी (ता. ८) दुपारनंतर तसेच रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडात पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यात भाजीपाला, ऊस पिकांचे नुकसान
Heavy RainAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बुधवारी (ता. ८) दुपारनंतर तसेच रात्री वादळी वारे (Stormy Winds), विजांच्या कडकडात (Lightning) पाऊस झाला. फळझाडांच्या फांद्या मोडल्या, भाजीपाला पिके, उसाचे नुकसान झाले.

दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वेधशाळेत गुरुवारी (ता. ९) सकाळी ११.५ मिलिमीटर, तर परभणी शहरात ७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा आदी तालुक्यांतील अनेक गावशिवारांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे विजेचे खांब वाकले, वीजवाहक तारा तुटल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या फांद्या तुटल्या, झाडे मोडून पडली. फळगळ झाली. उसाचे पीक आडवे झाले. घरे, आखाड्यावरील निवाऱ्यांची पत्रे उडून गेली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com