Vegetable Damage : चंदगडमध्ये पावसाचा भाजीपाला पिकाला फटका

चंदगड तालुक्यातील पार्ले, जेलुगडे, कळसगादे परिसरात वादळी वारा आणि गारांसह झालेल्या पावसाने बिनीस, मिरची भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली.
Tomato Damage
Tomato DamageAgrowon

Kolhapur News : चंदगड तालुक्यातील पार्ले, जेलुगडे, कळसगादे परिसरात वादळी वारा (stormy wind) आणि गारांसह (Hail) झालेल्या पावसाने बिनीस, मिरची भाजीपाला पिके (Vegetable Crop) जमीनदोस्त झाली.

या तीन गावांत मिळून सुमारे बाराशे एकरवर भाजीपाला पिके घेतली जातात. त्यावरच शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र चालते. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. सुमारे आठ ते दहा कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

त्याशिवाय आंबा, काजू, फणस, जांभूळ यासारख्या फळझाडांची फळे गळून पडली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तालुक्याच्या दक्षिण भागातील कळसगादे, पार्ले, जेलुगडेपासून तिलारीनगरपर्यंतचा पट्टा पांढऱ्या हिणकस मातीचा.

अति पावसामुळे या जमिनीत भाताशिवाय इतर पीकच होत नव्हते. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता नसल्याने आठ महिने शेती पडून राहात होती. काही वर्षांपासून येथील शेतकऱ्याने विंधन विहीर, विहिरीच्या पाण्यावर भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली.

Tomato Damage
Crop Damage Update : नुकसानग्रस्त भागाची पाहणी-पंचनामे होतील, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत किती?

नीस आणि हॉटेलिंगसाठी लागणाऱ्या ओल्या मिरचीवरच भर होता. त्याचे प्रमाण एवढे वाढले की बेळगाव, गोव्याच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला येथून जाऊ लागला.

केवळ तीन ते चार महिन्यांत चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागल्याने अनेकांनी वीज पंप, पाईपलाईन, जमीन दुरुस्ती यात पैसे गुंतवले. यावर्षीही बिनीस व मिरचीचे उत्पादन चांगले होते. काही शेतकऱ्यांनी पहिले दोन तोडे घेतले होते. मात्र शनिवारी (ता. ८) झालेल्या पावसाने या पिकांची माती केली.

आंबा, काजू, फणस, जांभूळ यासारखी फळझाडांवरील परिपक्व होण्याच्या अवस्थेत असलेली आणि कच्ची फळेसुद्धा वाऱ्याच्या हेलकाव्यामुळे गळून पडली. जागोजागी वृक्ष उन्मळून पडले. हे सर्व चित्र विदारक आहे.

तीन वर्षांपूर्वी कोरोनात वाहूतक व्यवस्था नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना बिनीस काढून रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. यावर्षी मात्र निसर्गानेच घाला घातल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

शासनाने मदत देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी परिसराला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. हा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com