दमडी ते रुपया

गेल्या शतकात जसा ग्रामीण भारत बदलला तसाच ग्रामीण महाराष्ट्रसुद्धा बदलला. दुनिया ज्या रुपयाभोवती फिरते त्या रुपयातही बदल झाला. इ.स. सहाव्या शतकापर्यंत रुपयाचा इतिहास मागे जातो.
Currency
Currency Agrowon

गेल्या शतकात जसा ग्रामीण भारत बदलला तसाच ग्रामीण महाराष्ट्रसुद्धा बदलला. दुनिया ज्या रुपयाभोवती फिरते त्या रुपयातही बदल झाला. इ.स. सहाव्या शतकापर्यंत रुपयाचा इतिहास मागे जातो. चाणक्याच्या काळामध्ये म्हणजेच चंद्रगुप्त मौर्याच्या काळात इ.स. पूर्व ३४० मध्ये चांदीचा रुपया अस्तित्वात होता. १५४० मध्ये शेर शहा सुरीच्या काळात १७८ चांदीच्या दाण्यांपासून रुपेरी रुपया बनविण्यात आला. त्या काळात चांदीच्या नाण्याला रुप्या, सोन्याच्या नाण्याला सुवर्णरुप, तांब्याच्या नाण्याला ताम्ररुप आणि शिशाच्या नाण्याला शिसरुप असे म्हटले गेले.

तीन फुटलेल्या कवड्यांपासून एक कवडी, १० कवडीची एक दमडी, दोन दमडीचा एक धेला किंवा दीड पाईचा एक धेला, तीन पाईचा एक पैसा, चार पैशाचा एक आणा, आणि १६ आण्यांचा एक रुपया अशी रुपयाची रचना होती. ‘कुणाला एक फुटकी कवडी देणार नाही’ अशा बोलण्याच्या अर्थ, मी कसलीच तोशीस मला स्वतःला लावून घेणार नाही म्हणजे तुला काही देणार नाही असा होतो. गेल्या एक हजार वर्षांमध्ये या वाक्प्रचारांनीच सर्वसामान्य लोकांमधले व्यवहार बांधले गेले आहेत. यामुळेच खालील अनेक मराठी व हिंदी मधल्या म्हणी लोकमान्य पावल्या आहेत.

Currency
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड

बंदा रुपया, एक फुटकी कवडी मी देणार नाही. सोळा आणे पीक आहे. एक फुटी कौडी भी नहीं दुंगा, धेले का काम नही करती हमारी बहु. चमडी जाए पर दमडी न जाए. पाई पाई का हिसाब रखना. सोलह आने सच. १८७३ मध्ये अचानक अमेरिकेमध्ये व युरोपीय खंडामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चांदी सापडली. १९ व्या शतकामध्ये जगातल्या सर्व महत्त्वाच्या अर्थसंस्था या सोन्याला पायाभूत मानू लागल्या. सोन्याच्या तुलनेत चांदीचे महत्त्व कमी झाले आणि भारताच्या रुपयाचे देखील अवमूल्यन झाले. या घटनेला ‘रुपयाची घसरण’ असे म्हटले गेले.

ब्रिटिश साम्राज्याच्या राजवटीमध्ये चांदीचे नाणे ही भारताची करन्सी म्हणून राहिली. १८३५ मध्ये मोनोमेटॅलिक सिल्व्हर स्टॅन्डर्ड ९९९ चांदी स्टॅन्डर्ड स्वीकारले गेले. १८७० मध्ये भारत व इंग्लंड समुद्राखालील केबल टेलीग्राफने जोडले गेले आणि त्यामुळे १८७५ पासून भारतातूनही इंग्लंडला निर्यात होणाऱ्या वस्तूंची रक्कम ही चांदीऐवजी भारत कौन्सील बिलच्या रूपाने अदा होऊ लागली. भारतातील चलनांचा अभ्यास करण्यासाठी १८९८ मध्ये भारतीय चलन समिती ऊर्फ फाऊलर कमिटीची स्थापना करण्यात आली. सोन्याला अधिकृत कायदेशीर चलन म्हणून मानणारा कायदा १५ सप्टेंबर १८९९ मध्ये करण्यात आला. मुंबईच्या टांकसाळीमध्ये सोन्याची नाणी बनविण्याच्या चर्चेला फक्त सुरुवात झाली.

Currency
Crop Damage : तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

१९०१ मध्ये एकूण ६७ लाख ५० हजार पौंडाची सोन्याची नाणी भारतीय लोकांच्या वापरासाठी ब्रिटिशांकडून देण्यात आली. ही नाणी चलनातून परत सरकारकडे येतील असे अपेक्षित होते. परंतु शासनाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. ५० टक्के नाणी शासनाकडे परत येऊ शकली नाहीत. म्हणून हा प्रयोग पूर्णपणे फसला. यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारत सरकारकडे असलेले सर्व सोने इंग्लंडमध्ये नेण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धाचा खर्च वाढल्यामुळे पौंडाची किंमत अतिशय घसरली. युद्ध संपल्यावर विस्टन चर्चिल यांनी युद्धाच्या पूर्वीच्या पातळीला पौंडची किंमत निर्माण केली. त्यामुळे सोन्याची किंमत अचानक घसरली. १९३१-४१ मध्ये इंग्लंडने फार मोठ्या प्रमाणावर भारताकडून सोने खरेदी केले. त्यासाठी सोन्याची किंमत वाढवली आणि त्या बदल्यात प्रिंट केलेली पेपर करन्सी दिली.

१९१८ मध्ये पाचव्या जॉर्ज या इंग्लंडच्या राजाच्या नावाने एक रुपयाचे चांदीचे नाणे सुरू झाले. हेच नाणे १९९२ मध्ये स्टेनलेस स्टीलपासून बनविले जाऊ लागले. १९६४ मध्ये भारताने एक पैसा, दोन पैसे, पाच पैसे व २० पैशांची ॲल्युमिनिअमची नाणी प्रसारित केली. १९५५ मध्ये भारताने नाण्यांमध्ये दशमान पद्धती आणली आणि एक पैशाचे तांब्याचे नाणे बनविले. भारत सरकारला केवळ नाणे म्हणून एक रुपयाची नाणी छापण्याचा अधिकार आहे. नाण्यांचे डिझाइन करणे आणि नाणी छापणे हे काम भारत सरकार करते. मात्र वितरणामध्ये ही नाणी रिझर्व्ह बँककडून आणली जातात. स्वातंत्र्यानंतर भारताने भारतीय स्टेट्समन, ऐतिहासिक व धार्मिक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने संस्मरण नाणी काढण्यास सुरुवात केली. १८६१ मध्ये भारताने पहिला पेपरचा पैसा प्रसिद्ध केला. त्यामध्ये १० रुपयांची नोट १८६४ मध्ये, पाच रुपयांची नोट १८७२ मध्ये, १० हजार रुपयांची नोट १८९९ मध्ये, १०० रुपयांची नोट १९०० मध्ये, ५० रुपयांची नोट १९०५ मध्ये, ५०० रुपयांची नोट १९६० मध्ये, एक हजार रुपयांची नोट १९०९ मध्ये छापण्यात आल्या.

रिझर्व्ह बँकेने नोटांचे उत्पादन १९३८ मध्ये सुरू केले आणि २, ५, १०, ५०, १००, १०००, १०,००० च्या नोटा प्रसारित केल्या. त्यांपैकी १००० व १०,००० च्या नोटा रद्द झाल्या आहेत. गेल्या १०० वर्षांत जसे ग्रामीण जीवन बदलले, लोकजीवन, लोकसाहित्य व लोकसंस्कृतीमध्ये बदल झाला तसाच बदल पैशामध्ये पण झाला. किंबहुना, पैशामध्ये झालेले स्थित्यंतर हे सर्वांत प्रभावी होते आणि त्याचा परिणाम समाजातील संपत्ती, सुखसोयी, कर, उत्पन्न, स्थलांतर अशा सगळ्याच गोष्टींवर झाला. रुपयातले हे स्थित्यंतर मानवी जीवनावर प्रचंड प्रभाव टाकून गेले असे म्हणता येईल. रुपया भवती फिरते दुनिया असे म्हणतात ते उगीच नाही

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com