
Parbhani Lumpy Skin Update : परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. ९) पर्यंत एकूण ४ हजार ३२२ जनावरांना लम्पी स्कीन आजार प्रादुर्भाव झाला आहे. उपचारानंतर ३ हजार ५४१ जनावरे बरी झाली आहेत. परंतु या आजारामुळे आजवर एकूण ४६२ जनावरांचा मृत्यू झाला.
त्यात वासरे २७६, बैल १२९, गायी ५५ या जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजाराने सक्रिय असलेल्या जनावरांची संख्या ३१९ होती. त्यापैकी १२५ जनावरांची प्रकृती गंभीर होती, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती.त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १४४ ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६२६ आहे.
बाधित गावांपासून ५ किलोमीटर परिघातील जनावरांची संख्या २ लाख ८० हजार ३९७ आहे. आजवर जिल्ह्यातील १ लाख गाय वर्गीय आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय असे एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणासाठी २ लाख ९९ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या होत्या. गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण २८ हजार ९ आहे. मंगळवार (ता. ९) पर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय व १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय व ५ हजार वासरे असे एकूण २ लाख ९७ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.