Certificate Of Sale Pesticides : कीटकनाशके विक्री प्रमाणपत्र अभ्यासक्रमास मुदतवाढीचा निर्णय

कीटकनाशके विक्रीसाठी पदविका प्रमाणपत्र असणे केंद्रीय कृषी मंत्रालयाने बंधनकारक केले आहे.
Chemical Pesticides
Chemical PesticidesAgrowon

Sangli News : कीटकनाशके विक्रीसाठी (Sale of pesticides) पदविका प्रमाणपत्र असणे केंद्रीय कृषी मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. मात्र, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मुदत संपल्याने विक्रेते अडचणीत आले होते. केंद्राने आता या अभ्यासक्रमाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

सांगली जिल्ह्यात तीन हजार प्रमाणपत्रधारक असून, यातील किमान १८-२० टक्के दुकानदारांना याचा फायदा होणार आहे.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आधीची मुदत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत होती. या काळात विक्रेत्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक संरक्षण विभागाचे संयुक्त सचिव आशिष कुमार श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या नव्या अधिसूचनेत आता ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

Chemical Pesticides
Online Pesticide Sale : ऑनलाइन कीटकनाशक विक्रीला केंद्राची परवानगी

अभ्यासक्रमाची आधीची मुदत समाप्त होऊन तीन महिने लोटले होते. प्रमाणपत्र नसल्यास कीटकनाशकांची विक्री बेकायदा ठरत होती. त्यामुळे किमान एक वर्षाने मुदत वाढवून देण्याची मागणी देशातील विक्रेत्यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती.

मुदतवाढ मिळेपर्यंत प्रमाणपत्र न बाळगल्याचा ठपका ठेवत विक्रेत्यांवर कारवाई करू नये, असाही आग्रह विक्रेत्यांनी धरला होता. केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी या दोन्ही मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ही समस्या किमान या वर्षासाठी तरी मिटली आहे.

कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी पदविका प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक आहे. मात्र, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मुदत संपली होती. राज्य संघटना पदाधिकान्यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांना भेटून ही समस्या निदर्शनास आणली होती. त्यांनी मंत्रालयाला सूचना दिल्याने विक्रेत्यांवर कारवाई टळलीच; पण आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
विनाश पाटील, जिल्हाध्यक्ष ॲग्रो इनपूट डीलर्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com