अकोले तालुक्यात चार गावांत विधवा प्रथा बंदीचा निर्णय

ग्रामसभांत निर्णय ः सामाजिक कार्यकर्त्यांकडून गौरव
अकोले तालुक्यात चार गावांत विधवा प्रथा बंदीचा निर्णय
Widow TraditionAgrowon

नगर : हेरवाड (कोल्हापूर) ग्रामपंचायतीने राज्यात पहिल्यांदा विधवा प्रथा (Widow Tradition) बंद करण्याचा निर्णय घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीच्या (Herwad Gram Panchayat) निर्णयाचे अनुकरण करीत नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चार ग्रामपंचायतींनी ग्रामसंभांत विधवा प्रथा बंद (Ban Widow Tradition) करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतींना असा निर्णय घेतला आहे त्या ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून गौरव केला जात आहे.

पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे यांसारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. तसेच विधवा महिलेला कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत सहभाग दिला जात नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर गदा येत असल्याने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व प्रबोधन करण्याचा ठरावाला कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झाली. त्यानंतर राज्य सरकारनेही असा उपक्रम राबवण्याबाबत आदेश काढला.

नगर जिल्ह्यात या उपक्रमाला अकोले तालुक्यात प्रतिसाद मिळत आहे. अकोले तालुक्यातील रुंभोडी ग्रामपंचायतीने सोमवारी (ता. ३०) ग्रामसभेत, गावातून विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखी ठराव घेतला. असा ठराव घेणारी रुंभोडी ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. ३१) आंबड, शेरणखेल, राजुर ग्रामपंचायतींनीही असे ग्रामसभांतून निर्णय घेतले असून आम्ही असा निर्णय घेत असलेल्या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत आहोत. पुरोगामी निर्णय घेण्यात रुंभोडी गावाने तालुक्याचे आजपर्यंत नेतृत्व केले आहे. त्यामुळे हा ठराव सर्वप्रथम रुंभोडी आणि इतर तीन गावांनी केल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हा विचार प्रसारित होईल असे मत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

रुंभोडीत माजी सरपंच शांताराम मालुंजकर यांनी या ठरावानंतर आता गावात प्रबोधन करण्याची गरज आहे, असे सांगितले. सखूबाई सावंत यांनी या ठरावाबद्दल समाधान व्यक्त करून धार्मिक कार्यात विधवा, परित्यक्ता महिलांना जी सापत्नपणाची वागणूक दिली जाते त्याचे कथन केले.

या वेळी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी, ललित छल्लारे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठरावाबद्दल सरपंच रवींद्र मालुंजकर यांचा सत्कार केला. यावेळी उपसरपंच इंदिरा मालुंजकर, पोलिस पाटील गोरक्ष शिंदे, ग्रामसेवक एस. एस. एरंडे, सदस्य रमेश सावंत, संगीता मालुंजकर, भाऊसाहेब मधे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com