नांदेड जिल्ह्यात ९ हजार वटवृक्ष लागवडीचा निर्धार

वटपौणिमेला वटवृक्ष लावण्याचे वर्षा ठाकूर यांचे आवाहन
नांदेड जिल्ह्यात ९ हजार वटवृक्ष लागवडीचा निर्धार
Tree Plantation Agrowon

नांदेड : वटपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात वटवृक्ष लागवड (Banyan Tree Plantation) करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजार वृक्षांची लागवड (Tree Plantation) करण्याची ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येत आहे.

‘‘भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेला पर्यावरण साक्षरतेचा (Environment Literacy ) दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. यातील पर्यावरणाचा धागा लक्षात घेता प्रत्येकाने या दिवशी एक तरी वडाचे झाड लावावे,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी डॉ. विपिन व मान्यवरांच्या हस्ते वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने त्या बोलत होत्या. या वेळी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, साहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार उपस्थित होत्या.

घुगे म्हणाल्या, ‘‘गावात वटवृक्षाची लागवड करून ऑक्सिजन टँक निर्माण करावेत. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजनचे मूल्य प्रत्येकाने ओळखले आहे. ऑक्सिजन वृद्धीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com