MP Dr. Jayasiddheshwar Sivacharya Mahaswami : सोलापूर तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करा

सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी सर्वप्रथम लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत खा. डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
MP Dr. Jayasiddheshwar Sivacharya Mahaswami
MP Dr. Jayasiddheshwar Sivacharya MahaswamiAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी सर्वप्रथम लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत खा. डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी (MP Dr. Jayasiddheshwar Sivacharya Mahaswami) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली.

प्रामुख्याने सोलापूर जिल्हा विविध तीर्थस्थळामुळे ओळखला जातो. त्यामुळे सोलापूरला तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करा, अशी मागणीही त्यांनी या भेटीत पंतप्रधानांकडे केली.

खा. डॉ.जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी नुकतीच संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचा शाल, हार घालून सन्मान केला.

MP Dr. Jayasiddheshwar Sivacharya Mahaswami
Narendra Modi : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना धोरणांच्या मध्यवर्ती आणले : पंतप्रधान मोदी

याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याबाबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

सोलापूर जिल्ह्यातील देवस्थानांची तीर्थक्षेत्राची मोदी यांना संपूर्ण माहिती असल्यामुळे केंद्र सरकारने सोलापूर जिल्हा हा तीर्थक्षेत्र जिल्हा घोषित करून तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याची मागणी केली.

या घोषणेमुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे सोलापूर येथे टेक्स्टाइल पार्क देण्याबाबत पुन्हा एकदा पंतप्रधानांकडे विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com