Crop Damage: ओला दुष्काळ जाहीर करा: स्वाभिमानी शेतकरी संघटना

जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात सरासरी २४४ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या २४८ टक्के जास्त म्हणजे ६०६ मिलिमीटर पाऊस फक्त २० ते २२ दिवसांत पडल्याने पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

नांदेड : पावसामुळे नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा उभा राहावा यासाठी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ‘रास्ता रोको’ करण्यात आले.

Wet Drought
Cotton Production:दर्जेदार कापूस उत्पादनात हेच ध्येय

पीकविमा (Crop Insurance) शंभर टक्के मंजूर करा व इतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. १०) सोनखेड येथे राष्ट्रीय महामार्गावर माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे व युवा आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात खरिपाची पेरणी (Kharif Sowing) जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्यानंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस (Cotton) ही पिके कोवळ्या अवस्थेत असताना जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात सरासरी २४४ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या २४८ टक्के जास्त म्हणजे ६०६ मिलिमीटर पाऊस फक्त २० ते २२ दिवसांत पडल्याने पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Wet Drought
Ethanol Production: इथेनॉलकडे साखर वळवण्याचे प्रमाण चार वर्षांत अकरापट

या वेळी धर्मवीर शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अंगद पाटील, प्रशांत पाटील मुगल, तालुका अध्यक्ष लोहा मारुती पाटील भुजबळ, गणेश कापसे, गजानन सावळे, लक्ष्मण ढवळे, शिवाजी शिखरे, व्‍यंकटी कदम लक्ष्मण चव्हाण अजय पावडे व असंख्य कार्यकर्ते व शेतकरी रास्ता रोको मध्ये सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com