Ujani Water Level Decrease : उजनीच्या पाणी पातळीत घट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Ujani Dam : उजनी धरण शंभर टक्के भरूनही पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे.
Ujani Water Level
Ujani Water LevelAgrowon

Water Level News : उजनी धरण शंभर टक्के भरूनही पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बँकाचे लाखो रुपयांचे कर्ज काढून दहा किलोमीटरहून अधिक लांबीच्या पाइप लाईन शेतकऱ्यांनी केल्या आहेत. परंतु पाणी पातळी खालावल्याने पाइप, केबल, स्टार्टर, विद्युतपंप आदी उपकरणे वाढवण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे.

धरण शंभर टक्के भरूनही मेच्या पहिल्या आठवड्यात शून्य टक्के पर्यंत पाणी पातळी खालावली आहे. म्हणजेच धरण पाणीपातळी उणेमध्ये गेली आहे प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे ही वेळ आली आहे, अशा प्रतिक्रियाही शेतकऱ्यांमधून येत आहेत.

Ujani Water Level
Ujani Dam : उजनी धरणात किती राहिलाय पाणीसाठा?

जून महिन्यात पावसाने ओढ दिली, तर येथील मुख्य पीक असलेल्या उसासह लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.

शेतमालाचे अस्थिर बाजार भाव, खतांचे वाढलेले दर, नापिकी, नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात वेगाने घटणाऱ्या पाणी पातळीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

उजनी धरणातून मराठवाड्याला २१ टीमसी पाणी देण्याचे नियोजन असून, त्याचे पहिल्या टप्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. मराठवाड्याला पाणी द्यायच्या आधीच उजनी धरणाची अशी परिस्थिती होत असेल, तर भविष्यात उजनी लाभक्षेत्रातील शेती, मत्यव्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होणार आहे. तर जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर गंभीर परिणाम होणार आहे. औद्योगिक वसाहतींच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्नही आ वासून उभा राहणार आहे.
गणेश मनोहर झोळ, वाशिंबे, ता.करमाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com