Cotton Seed Demand : कपाशी बियाण्यांच्या १ लाख ६० हजार पाकिटांची मागणी

Cotton Seed Update : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात ३५ हजार हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या क्षेत्रात २ हजार ८४१ हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.
 Cotton Seed
Cotton SeedAgrowon

Hingoli Cotton Seed News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात ३५ हजार हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या क्षेत्रात २ हजार ८४१ हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कपाशी बियाण्यांच्या १ लाख ६० हजार ७९३ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र ८४ हजार २७० हेक्टर आहे. त्यात हिंगोली तालुका १२ हजार २३० हेक्टर, कळमनुरी तालुका १८ हजार ७६० हेक्टर, वसमत २० हजार २२० हेक्टर, औंढा नागनाथ १८ हजार ६० हेक्टर व सेनगाव तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

 Cotton Seed
Desi Cotton Seed : देशी कापूस बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या परराज्यांत फेऱ्या

गेल्या काही वर्षांत कपाशीचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. गतवर्षी (२०२२) जिल्ह्यात कपाशीची ३२ हजार १५९ हेक्टरवर लागवड झाली होती.

यंदा सर्वच तालुक्यांतील कपाशीच्या क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहेत. त्यासाठी कपाशीच्या बी. जी. १ वाणांच्या बियाण्याच्या १६ हजार ८० पाकिटे, बी. जी. २ वाणाच्या बियाण्याची १ लाख ३६ हजार ६७४ पाकिटे, नॉन बी.टी. बियाण्याच्या ८ हजार ३९ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

कपाशीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये), बियाणे पाकिटांची मागणी

तालुका- २०२२ मधील क्षेत्र - २०२३ प्रस्तावित क्षेत्र- बियाणे पाकिटे मागणी

हिंगोली - २७०२- २९४३- १३५०९

कळमनुरी - ४८००- ५१०० - २४०००

वसमत - १०६४६ - ११६४६- ५३२२९

औंढानागनाथ- ७८३०- ८३३० - ३९१५०

सेनगाव - ६१८१ - ६९८१ - ३०९०५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com