हिंगोली जिल्ह्यात ७३ हजार क्विंटल बियाण्याची मागणी

जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक
Seed Demand
Seed DemandAgrowon

हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) विविध पिकांच्या ७३ हजार ६८० क्विंटल बियाण्याची मागणी (Seed Demand) करण्यात आली आहे. आजवर विविध पिकांच्या बियाणे मागणीच्या सुमारे ५० टक्के बियाण्याचा पुरवठा (Seed Supply) झाला अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी दिली.

जिल्ह्यात खरीप २०१९ मध्ये एकूण ६८ हजार ७८५ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. २०२० मध्ये ६८ हजार ३९२ क्विंटल आणि २०२१ मध्ये ६७ हजार ८९६ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. या तीन वर्षात सरासरी ६८ हजार २५८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. जिल्ह्यात मागील खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख २४ हजार ६०० हेक्टर आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ४९ हजार ७३२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. ‘महाबीज’कडे ७ हजार ६२५ क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे ६६ हजार ५५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

सोयाबीनची गतवर्षी २ लाख ५५ हजार २२९ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या तीन वर्षांत सोयाबीन बियाण्याची सरासरी ६२ हजार ३४६ क्विंटल विक्री झाली. यंदा २ लाख ६० हजार २२९ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार १ लाख ९५ हजार १७२ क्विंटल बियाण्याची गरज आहे. ग्रामबीजोत्पादन आणि शेतकऱ्यांकडील घरचे राखीव बियाणे मिळून एकूण २ लाख ८२ हजार ४९९ क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. घरच्या बियाण्याची उगवणक्षमता तपासून पेरणी करणे आवश्यक आहे. कपाशीच्या प्रस्तावित ३० हजार ६५४ हेक्टर हजार क्षेत्रासाठी बी.टी. कपाशी बियाण्याच्या १ लाख ५३ हजार २६९ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

प्रस्तावित क्षेत्रानुसार बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)

पीक...प्रस्तावित क्षेत्र...बियाणे मागणी

सोयाबीन...२६०२२९...६८३१०

कपाशी...३०६५४...७६६

तूर...४०७८५...३३६४

मूग...७५००...४७७

उडीद...५२००...३८८

ज्वारी...४५१८...३३८

मका...७५५...३३.९८

तीळ...४८...०.६६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com