Wheat Straw
Wheat StrawAgrowon

Wheat Straw : गव्हाच्या भुश्शाला मोठी मागणी

गव्हाचा भुसा वाळलेल्या चाऱ्याचा पर्याय शोधला जात आहे. दिवसेंदिवस दुधाच्या भावात होणाऱ्या वाढीमुळे दूध उत्पादक समाधानी दिसत आहेत.

बापूसाहेब कोकणे

Nagar News : पशुधनाला कोरडा चारा म्हणून देत असलेल्या गव्हाच्या भुशाला परिसरात मागणी वाढली आहे. त्यामुळे कधी काळी शेतातच पेटवून दिल्या जाणाऱ्या भुशाला सोन्याचे दिवस आले आहेत.

त्यामुळे नगरसह अन्य भागांतून शेतकरी शक्य तेवढा भुसा उपलब्ध करून साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे कधीकाळी वाया जाणारा गव्हाचा भुसा आता मोलाचा ठरत आहे.

नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. पशू विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा देणेही गरजेचे आहे. पूर्वी बाजरी, ज्वारीचा कडबा सहज उपलब्ध व्हायचा. आता मात्र ज्वारीचे क्षेत्रच कमी झाले आहे.

Wheat Straw
Wheat Production: गव्हाचा प्रमुख निर्यातदार असणाऱ्या भारतावर आता आयातीची वेळ येणार?

त्यामुळे ज्वारीचा कडबा मिळत नाही. दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गव्हाचा भुसा वाळलेल्या चाऱ्याचा पर्याय शोधला जात आहे. दिवसेंदिवस दुधाच्या भावात होणाऱ्या वाढीमुळे दूध उत्पादक समाधानी दिसत आहेत.

गव्हाचा भुसा पर्याय म्हणून जनावरांना एक उत्तम चारा म्हणून वापरला जातो. त्यामुळे दूध उत्पादक पशुधनाला कडबा (ज्वारीचा चारा) देतात. मात्र तो उपलब्ध होत नसल्यामुळे त्याची जागा गव्हाच्या भुशाने घेतली आहे.

पशुधन मालकांकडून शेतकऱ्यांना भुशाच्या बदल्यात एकरी सोंगणीचा खर्च देऊन गहू तयार करून दिला जात आहे. उसापेक्षा भुशाने (सात ते आठ हजार रुपये टन) भाव खाल्ला आहे. गव्हाबरोबरच इतर पिकांच्या भुशालाही मागणी वाढत आहे.

Wheat Straw
Crop Damage : पावसाने कांदा, गहू, ज्वारी पिकांसह वीटभट्टीवाल्याचे मोठे नुकसान
दुभत्या जनावरांना पेंड व ओल्या चाऱ्याबरोबरच कोरड्या चाऱ्याची गरज असते. त्यामुळे दुधाची फॅट चांगली लागण्यास मदत होते. भाव योग्य मिळतो.
बाळासाहेब साप्ते, दूध उत्पादक, टाकळीभान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com