Onion purchase : नाफेडकडून उन्हाळी कांदा खरेदी करा ; भारती पवारांनी केली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी

Onion Market Update : कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने नाफेडमार्फत लवकरात लवकर उन्हाळी कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे डाॅ. भारती पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
bharti pawar met piyush goyal
bharti pawar met piyush goyalagrowon

NAFED Onion Procurement : सध्या रब्बी हंगामातील कांदा दरात (Onion Rate) मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यानंतर केंद्र सरकारने लवकरात लवकर नाफेडच्या (NAFED) माध्यमातून कांदा खरेदी (Onion Procurement) सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष्य गोयल यांच्याकडे केल आहे.

नाफेडमार्फत (NAFED Onion Procurement) उन्हाळी कांदा खरेदी केल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचे निवेदन डाॅ. पवार यांनी वाणिज्यमंत्र्यांना दिले.

bharti pawar met piyush goyal
Nashik Onion Crop Damage : पाऊस, गारपिटीमुळे कांद्याची काढणीपूर्वी नासाडी

सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी कांद्याच्या दरात (onion Price) मोठी घसरण झाल्याने त्याचा मोठा आर्थिक राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.

आस्मानीसोबत सुलतानी संकटामुळे राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी नाफेडमार्फत (Nafed) तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal ) यांच्याकडे केली आहे.

bharti pawar met piyush goyal
Minister Dr. Bharti Pawar : कांदा धोरण सुचविण्यासाठी अचूक माहिती द्यावी

निवेदनात म्हटले आहे की, कांदा उत्पादनामध्ये जगामध्ये भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो. मात्र, मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत 2022 मध्ये रुपये 351 कोटी रक्कमेचा 2 लाख 38 हजार 196 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी रुपये 1 हजार 475 प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मंत्री पियुष गोयल यांच्याकडून आश्वासन देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

त्यामुळं त्यांच्या या मागणीवर केंद्र सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सरकारच्या निर्णयाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com