2000 Notes Ban : आता 2000 च्या नोटाही चलनातून बाद, दुकाने आणि पेट्रोल पंपावर गर्दी

Rupees 2000 Currency Notes : 2000 रुपयांची नोट बंद झाल्याची बातमी येताच लोक चिंतेत असून बाजारात गर्दी होऊ लागलेय.
2000 Notes Ban : आता 2000 च्या नोटाही चलनातून बाद, दुकाने आणि पेट्रोल पंपावर गर्दी

Rupee Note Ban : भारतीय रिजर्व बॅंकने दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याचे आदेश दिल्यानंतर या नोटा तिजोरीत ठेवणाऱ्या नागरिकांसह शहरातील व्यापारी, उद्योजकांचे धाबे दणाणले. दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई पाच वर्षांपासून बंद असून दोन वर्षांपासून एटीएममध्येही त्यांचा वापर होत नाही. 20 हजार रुपयांपर्यंतच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँक खात्यातून बदलता येतील.

2000 Notes Ban : आता 2000 च्या नोटाही चलनातून बाद, दुकाने आणि पेट्रोल पंपावर गर्दी
Sharad Pawar : पुणे जिल्हा नियोजन बैठक चक्क शरद पवारांची हजेरी

बँकांना 2 हजाराच्या नोटा परत करण्याचे परिपत्रक जारी झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी देशभराच्या बाजारपेठेत गोंधळ उडाला. परिस्थिती अशी होती की लोकांनी प्रत्येक दुकानात 2000 रुपयांच्या नोटा घेऊन गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी दोन हजाराच्या नोटा घेण्यास नकार दिला.

2000 Notes Ban : आता 2000 च्या नोटाही चलनातून बाद, दुकाने आणि पेट्रोल पंपावर गर्दी
Processed Honey Products : मध प्रक्रियायुक्त उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी

2 हजारांच्या नोटा बंदीची बातमी येताच रात्री 8 नंतर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली. वस्तू खरेदीसाठी लोक दोन हजाराच्या नोटा घेऊन येऊ लागले आहेत. काही दुकानदार बदलत आहेत तर काही नकार देत आहेत. विशेष म्हणजे 23 मे पासून लोक 2000 च्या नोटा बदलू शकणार आहेत. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचे RBI चे ताजे परिपत्रक बाहेर येताच पुन्हा एकदा 'नोटाबंदी'ची चर्चा बाजारात रंगली आहे. पुण्यातील पेट्रोल पंपावरही आपली वाहने तेल भरून घेण्यासाठी आलेले अनेक लोक 2000 रुपयांच्या नोटा देण्याचा प्रयत्न करत होते.

रिझर्व्ह बँकेनुसार, तुम्ही 2000 रुपयांची नोट घेऊन नोटाबंदीचा विचार करू नये. आता तुम्ही ही 2000 रुपयांची नोट बाजारात चालवू शकता. तसेच, तुम्ही त्यातून वस्तू खरेदी करू शकता आणि व्यवहार करू शकता. हे पूर्णपणे वैध आहेत आणि जर कोणीही ते घेण्यास नकार देऊ शकत नाही, परंतु ते फक्त 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच राहतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com