खते मुबलक; टंचाई नसल्याचा दावा

एकूण ४५.२० लाख टन खतपुरवठा मंजूर
खते मुबलक; टंचाई नसल्याचा दावा
FertilizerAgrowon

पुणे ः येत्या खरिपासाठी (Kharif Season) राज्यात रासायनिक खताची टंचाई (Fertilizer Shortage) होणार तसेच भावदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार, अशा अफवा बाजारात पसरविण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यात खते (Fertilizer Stock) मुबलक असून टंचाई नसल्याचा दावा कृषी खात्याने (Agriculture Department) केला आहे.

राज्यातील शेतकरी ६२ लाख टन खताची खरेदी दरवर्षी करतात. त्यात रब्बीमध्ये २७ लाख टन, तर खरिपात जवळपास ३५ लाख टन खतांची खरेदी होत असते. गेल्या पाच दशकात राज्याची शेती नगदी व बागायती पिकांकडे वळाल्यामुळे खतांच्या वापरात अनेक पटीने वाढ झाली आहे. १९८० च्या खरीप हंगामात प्रतिहेक्टरी २१.४ किलो खताचा वापर शेतकरी करीत होते. आता तेच प्रमाण गेल्या खरिपात प्रतिहेक्टरी १३८.६० किलोपर्यंत आले आहे.

खतांचा मागील तीन वर्षांतील वापर, बदलती पीक पद्धती, उपलब्ध सिंचन क्षमता, जिल्ह्याची मागणी आणि जमीन सुपीकता निर्देशांक अशा पाच मुद्द्यांचा विचार करून खताचा पुरवठा निश्चित केला जातो. राज्याने यंदा ५२ लाख टन खताची मागणी केली होती. मात्र, राज्यातील खतांची शेतकऱ्यांकडून होणारी सरासरी खरेदी ४२ ते ४५ लाख टनांच्या आसपास आहे. त्यामुळे यंदा एकूण ४५.२० लाख टन खतांचा पुरवठा मंजूर करण्यात आलेला आहे.

२०२० च्या खरिपात शेतकऱ्यांनी खताचा वापर ३३ लाख टनांवरून थेट ४७ लाख टनापर्यंत नेला होता. मात्र, गेल्या खरिपात जवळपास तीन लाखाने वापर घटून ४३.५२ लाख टन खतांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती. “यंदाच्या हंगामात शेतकरी ४५ लाख टनांच्या आसपास खतांची खरेदी करतील. मात्र, रब्बी हंगामाताील १२ लाख टनापेक्षा जास्त खते पडून आहेत. त्यामुळे एकूण ५७ लाख टनांहून अधिक खते बाजारात उपलब्ध असतील. त्यामुळे टंचाई होणार नाही,” असा दावा कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने केला.

खरिपातील खत वापराचा कल
खताचा प्रकार...खरीप २०२१ मधील वापर...खरीप २०२२ मधील मंजूर पुरवठा...शिल्लक खते...खरीप २०२२ मधील एकूण उपलब्ध खते
युरिया...१४.१५...१५.५०...४.३४...९.८४
डीएपी...३.४३...५.७०...०.५४...६.२४
एमओपी...२.२९...३.००...०.२४...३.२४
संयुक्त खते...१६.३८...१४.००...३.१८...१७.१८
एसएसपी...६.९७...७.००...३.८५...१०.८५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com