Save Girl : तिसऱ्या मुलीच्या नावे एक लाखाची ठेव

ज्या दांपत्यांना पहिल्या दोन मुली असताना तिसरी मुलगी झाल्यास त्या तिसऱ्या मुलीच्या नावे एक लाख रुपयांची ठेव ठेवली जाणार आहे.
Save Girl
Save GirlAgrowon

नगर ः ज्या दांपत्यांना पहिल्या दोन मुली असताना तिसरी मुलगी झाल्यास त्या तिसऱ्या मुलीच्या नावे एक लाख रुपयांची ठेव (deposit of one lakh in favor of the third daughter) ठेवली जाणार आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पालक या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती काकासाहेब मस्के ममोरियल फाउंडेशनचे (Kakasaheb Mhaske Memorial Foundation) अध्यक्ष डॉ. सुभाष मस्के यांनी दिली.

Save Girl
Cotton Rate : कापूस आवक का घटली?

डॉ. म्हस्के म्हणाले, की वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलासाठी स्त्री भ्रूणहत्या केल्याचे प्रकार होतात. काही दांपत्य मात्र मुलीवर समाधान मानतात. त्यामुळे अशा पालकांसाठी २०२२ नंतर ज्या दांपत्यास सलग तीन मुली झाल्या आहेत, अशा दांपत्याच्या तिसऱ्या मुलीच्या नावे नगरच्या अंबिका महिला बँकेत एक लाख रुपयांची ठेव ठेवण्यात येणार आहे.

Save Girl
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दर टिकणार का?

त्या मुलीच्या अठराव्या वर्षी म्हणजेच लग्नापर्यंत तिला हे पैसे दिले जाणार आहेत. ही योजना राज्यभर राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी अंबिका महिला बॅंकेच्या अध्यक्षा मिस्कीन, संचालिका प्रा. मेधा काळे यांच्याकडे डॉ. सुमती म्हस्के यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला.

१९७५ पासून म्हस्के फाउंडेशनच्या विविध संस्थांचे कार्य सुरू करण्यात आले आहे. काकासाहेब म्हस्के यांनी समाजकार्यासाठी जो वसा घेतला होता. तो वसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे डॉ. मस्के म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com