देवाचिये द्वारी उभा क्षणभरी

संत ज्ञानेश्‍वर माउली म्हणतात, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी... जिथे दिव्यत्व आहे तिथे आपण तत्पर राहून थोडी वाट पाहायला हवी.
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वरAgrowon

ज्योती आधाट-तुपे

संत ज्ञानेश्‍वर माउली म्हणतात, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी... जिथे दिव्यत्व आहे तिथे आपण तत्पर राहून थोडी वाट पाहायला हवी. मग ती वाट आपण शिक्षक असू तर आपल्या शाळेत, आपल्या बालकांच्या क्षमता प्राप्तीसाठी पाहू शकतो. बालकांमधील देवत्व पाहण्यासाठी आपल्याला तयार, तत्पर राहावं लागतं. कारण आपण तत्पर असू तर ते देवत्व आपण पाहू शकतो. म्हणजेच काय तर या दिव्यत्व असलेल्या बालरूपी देवाच्या दारात आपण क्षणभर थांबलं पाहिजे. कारण तिथे निरागसता असते.

निर्व्याज प्रेम असतं. निःस्वार्थी वृत्ती असते. हे सगळं जिथं असतं तिथं साक्षात परमेश्‍वरच असतो. हा झाला शिक्षक आणि बालकांमधला अनुभव. खरंच ज्ञानेश्‍वर माउलींची एक ओवी जरी घेतली तरी त्याचा किती खोलवरचा गूढ अर्थ आपल्या जीवनात शांती भरण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत म्हणायचे, माझी चार मुले म्हणजे साडेतीन चरणांची ओवी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. विठ्ठलपंतानी देहान्त प्रायश्‍चित्त सपत्नीक घेतले व जाताना अश्‍वत्थ वृक्षाची काठी तिथेच रोवली. नंतर त्याला पालवी फुटली.

संत ज्ञानेश्वर
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

अश्‍वत्थ म्हणजे स्वयंभू, प्रतिकूलतेतही फुलणारा, जगात काहीही शाश्‍वत नाही. अश्‍वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड. भारतीय संस्कृतीतील पूजनीय वृक्षांमध्ये हा सर्वोच्च स्थानी आहे. सर्व अडचणी दूर करणारे पिंपळ हे वृक्ष आहे. मानसिक मुक्तीचे साधन म्हणजे ज्ञानेश्‍वरी. भगवंत म्हणतात, आपणही बासरीसारखं रिकामं राहावं. म्हणजे परमेश्‍वर त्यात सूर भरतो. ज्ञानोबा मुक्ताईला बोध देतात.

बोच लागली पायी, डोळ्यातून वाहे गंगामाई

संत ज्ञानेश्वर
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

म्हणजे पायात काटा रुतला आणि पाणी मात्र डोळ्यात येते. कारण ते चैतन्याचं रूप आहे. माउली हे वेदनेवर फुंकर घालणारे अनोखे तत्त्व आहे. ज्ञानोबा आणि सोपान यांची एका सुंदर विषयावर चर्चा होते. जे आपल्यासमोर आलं ते भगवंताचं समजून स्वीकारायचं. म्हणजे त्रास होत नाही. कारण माणूस हा वाईट नसतो. त्याची परिस्थिती व स्वभावानुसार तो बदलतो. देव आणि राक्षस हे स्वर्गात आणि नरकात नसून ते आपल्या मनात असतात.

प्रवृत्ती आणि निवृत्तीचे सुंदर विवेचन माउली करतात. प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती. प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडल्याशिवाय मला सुख मिळणार नाही असा जो विचार आहे, त्याला ज्ञानेश्‍वर महाराज निवृत्ती म्हणतात. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी, अमृतानुभव, हरिपाठ, शेकडो अभंग याद्वारे गुरुवर्यांचे अनेक प्रकाराने भाववर्णन करणारे ज्ञानदेव म्हणतात, ‘‘माझ्या निवृत्तीरायाचे रूप मोठे आहे- आकाशाहून.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com