
डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. अनंत इंगळे, डॉ. विवेक चिमोटे
Soybean Market : वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणारे सोयाबीनचे अनेक चांगले वाण उपलब्ध आहेत. त्यातही कोणत्याही एकाच वाणाची निवड करण्यापेक्षा किंवा जास्त महाग बियाणे खरेदी करून एकाच वाणाची लागवड करण्यापेक्षा सोयाबीन पिकामध्ये आपण वाणाची विविधता आणावी.
त्यामुळे वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये होणार नुकसान कमीत कमी राखणे शक्य होईल.
पी.के.व्ही. अंबा (पी.के.व्ही. ए.एम.एस.-१००३९) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे २०२०-२१ मध्ये प्रसारित केलेले, ९५-९६ दिवसांत परिपक्व होणारे, मध्यम जमिनीत अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण, ३८ ते ४५ × ५ ते ८ सेंमी वर लागवड करावी. बदलत्या हवामानास अनुकूल व शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी असलेले वाण.
पी.डी.के.व्ही. यलो गोल्ड (ए.एम.एस.-१००१): डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे २०१८ मध्ये प्रसारित केलेले, ९५ ते १०० दिवसांत परिपक्व होणारे, मूळकुज व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक वाण.
पी.डी.के.व्ही. सुवर्ण सोया (ए.एम.एस –एम.बी.-५-१८) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे २०१९ मध्ये प्रसारित करण्यात आलेले, ९८ ते १०२ दिवसांत परिपक्व होणारे, सरासरी उत्पादन २४-२८ क्विंटल /हे.
जे. एस. -९३०५ : हे वाण २००२ मध्ये प्रसारित झाले. ८५-९० दिवसांत परिपक्व होणारे लवकर येणारे वाण, हलकी व मध्यम जमीन, तसेच ३० ते ३८ सेंमी x ६ ते ८ सेंमी अशी लागवड करावी. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी २०-२५ क्विंटल.
जे. एस. -३३५ : १९९४ मध्ये प्रसारित झालेले अतिशय लोकप्रिय असे वाण. ९५-१०० दिवसांत परिपक्व होते. ३८ × १० सेंमी अंतरावर मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी २५ ते २८ क्विंटल.
जे. एस. -२०९८ : २०१७-१८ मध्ये प्रसारित झालेले, उंच वाढणारे असल्याने हार्वेस्टरने काढण्यास योग्य वाण, ९५-९८ दिवसांत परिपक्व होऊन सरासरी २५ ते २८ क्विंटल उत्पादन देणारे वाण.
जे.एस. ९५६०: लवकर येणारे (८२-८८ दिवस), चार दाण्यांच्या शेंगा असलेले तसेच दुष्काळ सदृश परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण.
एम. ए.यू.एस. -७१ (समृद्धी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून २०१० मध्ये प्रसारित झालेले, ९५-१०० दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी २८-३० क्विंटल.
एम. ए.यू.एस. -१५८ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून २०१० मध्ये प्रसारित झालेले, ९३ ते ९८ दिवसांत परिपक्व होणारे, हलक्या व मध्यम जमिनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी २६ ते ३१ क्विंटल.
एम. ए.यू.एस. -६१२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून २०१६ मध्ये प्रसारित झालेले, ९४ ते९८ दिवसांत परिपक्व होणारे, अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण, उंच वाढ, तसेच वातावरण बदलामध्ये तग धरून उत्पादन देणारे वाण. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी ३० ते ३२ क्विंटल. दुष्काळसदृश परिस्थिती व आंतरपीक पद्धतीत अतिशय योग्य असे वाण.
एम.ए.सी.एस -१४६० : ९५ दिवसांत परिपक्व होणारे व चांगले उत्पादन देणारे वाण, सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल.
एम.ए.सी.एस. -११८८ : १०० दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल.
एम.ए.सी.एस. -१४०७ : पूर्वेकडील राज्यांत लागवडीस योग्य व जास्त उत्पादन देणारे वाण, सरासरी ३२ ते ३९ क्विंटल प्रति/हे. १०० ते १०७ दिवसांत परिपक्व होणारे वाण.
एन.आर.सी. ३७ (अहिल्या -४) : २०१७ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांत लागवडीसाठी शिफारशीत. ९६ ते १०२ दिवसांत परिपक्व होणारे वाण. सरासरी उत्पादन ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टर.
एन.आर.सी. १५७ : २०२१-२२ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. उशिरा (२० जुलैपर्यंत) लागवडीसाठी शिफारशीत, ९४ दिवसांत परिपक्व होणारे वाण. सरासरी उत्पादन १६ ते २० क्विंटल प्रति हेक्टर.
एन.आर.सी. १३८ (इंदोर सोया १३८) : २०२१ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. तांबेरा आणि पिवळा मोझॅक रोगास प्रतिकारक्षम, ९० ते ९४ दिवसांत परिपक्व होऊन सरासरी उत्पादन २५-३० क्विंटल प्रति हेक्टर देणारे वाण.
वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणारे सोयाबीनचे अनेक चांगले वाण उपलब्ध आहेत. त्यातही कोणत्याही एकाच वाणाची निवड करण्यापेक्षा किंवा जास्त महाग बियाणे खरेदी करून एकाच वाणाची लागवड करण्यापेक्षा सोयाबीन पिकामध्ये आपण वाणाची विविधता आणावी. त्यामुळे वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये होणार नुकसान कमीत कमी राखणे शक्य होईल.
संपर्क - डॉ. मिलिंद देशमुख (सोयाबीन पैदासकार), ९४२२२१०४७६
डॉ. अनंत इंगळे, (संशोधन सहयोगी), ८३२९६६९०७७ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.